Join us

PHOTOS : मौनी रॉय पुन्हा झाली बोल्ड, व्हाईट क्रॉप टॉपमध्ये दिल्या हटके पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 16:04 IST

1 / 8
टीव्हीची सर्वाधिक लोकप्रिय ‘नागीन’ मौनी रौय हिची बातचं न्यारी. जिथे जाईल तिथे मौनी माहौल करते. तिची एक एक अदा वेड लावते. सोशल मीडियावरचे तिचे फोटोही तसेच खल्लास करतात.
2 / 8
सध्या मौनीचे असेच फोटो व्हायरल होत आहेत. टेबलवर बसून मौनीने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत. चाहते या फोटोंवर फिदा आहेत.
3 / 8
न्यूड मेकअप, वेवी टची हेअरस्टाईलमध्ये मौनी कमालीची सुंदर दिसतेय. उण्यापुऱ्या 5 तासांत तिच्या या फोटोंना 2 लाखांवर लाईक्स मिळाले आहेत.
4 / 8
या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. सुंदर, गॉर्जियस, ग्लॅमरस, हॉट अशा शब्दांत चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट्स करताना लिहिलं आहे.
5 / 8
मौनी सध्या एक डान्स रिअ‍ॅलिटी शो जज करतेय. लवकरच तिचा ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा रिलीज होतोय. या चित्रपटात ती रणबीर कपूर, आलिया भट व अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करतेय.
6 / 8
मौनी रॉयने यावर्षी जानेवारीत सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधली होती. गोव्यात हा लग्न सोहळा पार पडला होता. आधी दोघांनीमल्याळी रितीरिवाजांनुसार आणि नंतर बंगाली रितीरिवाजानुसार सुद्धा लग्न केलं होतं.
7 / 8
मौनीचा हबी सूरज हा दुबईत राहतो. बिझनेसमॅन आणि बँक इव्हेस्टर अशी त्याची ओळख आहे. सूरज हा मूळचा बेंगळुरूचा. सूरजने आर.व्ही.अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनीअरिंगमधील बी.टेक केलं आहे.
8 / 8
आता सूरज व मौनीची ओळख कशी झाली तर दुबईत. लॉकडाऊनमध्ये मौनी रॉय आणि सूरज एकमेकांना प्रथमच भेटले होते. लॉकडाऊनदरम्यान मौनी दुबईत अडकली होती. या दिवसांत ती तिच्या बहिणीच्या घरी होती. बहिणीच्या माध्यमातून तिची सूरजसोबत ओळख झाली होती.
टॅग्स :मौनी राॅयबॉलिवूड