Join us

प्रेमात धोका, दोनदा गर्भपात! ३३ व्या वर्षी अभिनेत्रीने घटस्फोटित पुरुषासोबत थाटलेला संसार; पण, घडलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 15:04 IST

1 / 8
९० च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांचे हृदय जिंकणारी प्रसिध्द अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी.
2 / 8
महिमाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये कामे केली .यात 'परदेस','धडकन','सौतन', 'सॅंडविच' अशा चित्रपटांचा समावेश आहे. अलिकडेच ही अभिनेत्री कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटात झळकली.
3 / 8
महिमा चौधरीचं प्रोफेशनल लाइफ जितकं चर्चेत राहिलं तितकंच तिचं पर्सनल लाइफही चर्चेत आलं.२००० साली भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस यांच्यासोबत भेट झाली.
4 / 8
त्यानंतर त्यांचे सूत जुळाले. मात्र, सगळं काही सुरळीत असताना लिएंडर पेस यांच्या एका चुकीमुळे हे नातं संपुष्टात आल्याचं सांगण्यात येतं.
5 / 8
वैवाहिक जीवनात अडचणी येत असताना महिमाचा दोन वेळा गर्भपात झाला. पण तिला आधार देण्यासाठी बॉबी तिथे नव्हता.तो तिला सोडून परदेशात राहायचा.
6 / 8
प्रसिद्धीच्या शिखरावर असताना ३३ व्या वर्षी महिमाने आर्किटेक बार्बी मुखर्जीसोबत लग्नगाठ बांधली. लग्नाआधीच गरोदर राहिल्याने अभिनेत्रीने २००६ साली लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
7 / 8
त्यानंतर २००७ मध्ये अभिनेत्रीने गोंडस मुलीला जन्म दिला.पण, कालांतराने महिमा आणि बार्बी यांच्यात खटके उडायला लागले. लग्नाच्या ७ वर्षांतच ते दोघेही विभक्त झाले.
8 / 8
२०२२ मध्ये महिमाला कर्करोगाचं निदान झालं आणि तिच्या करिअरला ब्रेक लागला. बराच काळानंतर ती पुन्हा एकदा इंडस्ट्रीत सक्रिय झाली आहे.
टॅग्स :महिमा चौधरीबॉलिवूडसेलिब्रिटी