Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यभर प्रेमासाठी तरसली, पतीने सोडली साथ! मातृत्वाचं स्वप्नही अपूर्णच राहिलं, बॉलिवूडच्या लावण्यवतीची वेदनादायक कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 12:02 IST

1 / 9
हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सौंदर्याने अनेक सिनेरसिकांच्या हृदयाची धडधड वाढविणाऱ्या अनेक अभिनेत्री होवून गेल्यात. त्यांच्यातील सार्वकालिक सर्वात सुंदर अभिनेत्री मानल्या गेलेल्या व १९५० - ६० च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर आपल्या सौंदर्याचे गारुड करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे मधुबाला.
2 / 9
मधुबाला म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले स्वप्न. भारतीय सौंदर्याचा प्रवास मधुबालाजवळ येऊन थांबतो, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
3 / 9
मधुबाला यांचे मूळचे नाव मुमताज बेगम जहाँ देहलवी. जन्म दिल्लीतला, १९३३ सालचा. एका पश्तून मुस्लीम परिवारातला. मधुबाला यांची बॉलीवूडमधील कारकीर्द जितकी ब्लॉकबस्टर होती तितकीच तिला वैयक्तिक आयुष्य असंख्य अडचणींनी भरलेलं होतं.
4 / 9
हिंदी समीक्षक मधुबालाच्या अभिनय काळाला 'स्वर्णयुग' म्हणतात. नर्गिस यांच्या नंतर भारतीय टपाल खात्याने मधुबाला यांचे तिकीट काढून मान दिला होता. मधुबालाचा मुघल-ए-आझम सारखा सिनेमा आजही वन ऑफ द क्लासिक्स मानला जातो.
5 / 9
केदार शर्मा यांनी या अभिनेत्रीला पहिला ब्रेक दिला. मधुबालांनी त्यांच्या क्षेत्रातील अनेक विक्रम नक्कीच मोडीत पाडले असते. मधुबालाचे नाव अनेकांसोबत जोडण्यात आलं होतं. मात्र, किशोर कुमारसोबतच्या तिच्या प्रेमाची खूप चर्चा झाली. मात्र, अभिनेत्रीला शेवटपर्यंत प्रेमासाठी तरसली.
6 / 9
'चलती का नाम गाड़ी' आणि 'हाफ टिकट' चित्रपटादरम्यान, मधुबाला आणि किशोर कुमार यांची भेट झाली. त्यांनी १९६० मध्ये लग्न केले, त्यानंतर ते लंडनला गेले.मधुबाला किशोर कुमार यांची चौथी पत्नी होती.
7 / 9
मात्र, देवाच्या मनात काही वेगळंच होतं १९५४ला बहूत दिन हुए चित्रपटाचं चित्रिकरण सुरू असताना मधुबालांना रक्ताची उलटी झाली. कंजेनिटल हार्ट डिझिस असल्याचे कळलं.
8 / 9
मधुबालाला हृदयरोग होता आणि १९५० पासून तिच्या आजारावर उपचार चालू होता. परंतु तिने ही गोष्ट सर्वांपासून लपून ठेवली. या आजरामुळे अभिनेत्रीला मातृत्वाचं सुख मिळालं नाही.
9 / 9
शेवटच्या काळात मधुबाला ९ वर्षे अंथरुणाला खिळल्या होत्या. १९६९ मध्ये वयाच्या ३६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
टॅग्स :मधुबालाबॉलिवूडसेलिब्रिटी