शाहरुखसोबत झळकली, रातोरात झाली स्टार! लग्नानंतर बॉलिवूडला ठोकला रामराम; आता काय करते माहितीये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 18:46 IST
1 / 7बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खानचा 'स्वदेस' चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे.2 / 7 याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जोशी. स्वदेस मधून हे मराठमोळं नाव चांगलंच प्रसिद्धीझोतात आलं. 3 / 7 गायत्री जोशीने २००० मध्ये फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनलचा खिताब जिंकला आणि त्यानंतर मिस इंटरनॅशनल २००० या सौंदर्य स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.4 / 7 गायत्री जोशी २००४ साली प्रदर्शित झालेल्या स्वदेश चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित चित्रपटात तिने गीता नावाचं पात्र साकारलं होतं.5 / 7 या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान प्रमुख भूमिकेत होता. हा चित्रपट खूप गाजला. मात्र, या चित्रपटानंतर अभिनेत्री इंडस्ट्रीत कुठेही दिसली नाही. 6 / 7 गायत्रीने २००५ साली उद्योगपती विवेक ओबेरॉय यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. विवेक यांची मुंबईत रिअर इस्टेट फर्म आहे. 7 / 7स्वदेसच्या रिलीजनंतर एका वर्षातच संसार थाटला आणि चित्रपटसृष्टीला रामराम केला.गायत्री सुद्धा या बिझनेसमध्ये हातभार लावते. मिडिया रिपोर्टनुसार, गायत्री जोशी आणि विकास ओबेरॉय यांची एकूण संपत्ती ४५,००० कोटी रुपये आहे.