Join us

२८ दिवसांत १८ किलो वजन केलं कमी, बॉलिवूड अभिनेत्याने सांगितलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 16:39 IST

1 / 7
एका बॉलिवूड अभिनेत्याने २८ दिवसांमध्ये तब्बल १८ किलो वजन कमी केलं. एका भूमिकेसाठी कलाकार स्वतःला किती झोकून देऊ शकतो, हे यातून बघायला मिळतं.
2 / 7
हा अभिनेता म्हणजे रणदीप हुड्डा. रणदीपने शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये याविषयी खुलासा केला.
3 / 7
रणदीप हुड्डाने 'सरबजीत' सिनेमासाठी २८ दिवसांमध्ये १८ किलो वजन कमी केलं होतं. यासाठी रणदीपने किती मेहनत घेतली याचा खुलासा त्याने केलाय.
4 / 7
सरबजीत यांना १८ वर्ष जेलमध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं. सुकलेली भाकरी खाऊन त्यांनी दिवस काढले होते. त्यामुळे रणदीपने या भूमिकेसाठी वजन कमी करायला सुरुवात केली.
5 / 7
'हिंदू धर्मात अनेक व्रत आहेत. या दिवशी उपवास केल्याने आपल्या शरीराला आराम मिळतो. खाऊन आपल्याला कायम सुस्तपणा येतो', असं रणदीपचं म्हणणं आहे
6 / 7
वजन कमी करण्यासाठी रणदीपने २८ दिवसांमध्ये फक्त मुबलक पाणी, ग्रीन टी आणि ब्लॅक टीचं सेवन केलं. प्रचंड मेहनत आणि त्रास होऊनही रणदीपने स्वतःचं वजन कमी केलं.
7 / 7
रणदीपची भूमिका असलेला 'जाट' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात रणदीपने खलनायकी भूमिका साकारली आहे.
टॅग्स :रणदीप हुडाफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सबॉलिवूड