Join us

Bobby Deol : "मी बॉबी देओल आहे, प्लीज मला काम द्या"; कामाच्या शोधात दारोदारी भटकत होता अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 11:07 IST

1 / 10
देओल कुटुंबाचा लाडका बॉबी देओल याने त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीत यश आणि अपयश हे दोन्ही पाहिलं आहे.
2 / 10
बॉबी करियरच्या वाईट काळाबद्दल अनेक वेळा बोलला आहे. आता त्याला पुन्हा एकदा ते संघर्षाचे दिवस आठवले. बॉबीने सांगितलं की, कामाच्या शोधात तो दारोदारी भटकत होता.
3 / 10
इंडिया टुडेशी बोलताना बॉबी देओल म्हणाला, 'जेव्हा मी वाईट काळातून जात होतो तेव्हा मी लोकांचे दरवाजे ठोठावले आणि म्हणालो, मी बॉबी देओल आहे, प्लीज मला काम द्या.'
4 / 10
'यात काहीही वाईट नाही. कमीत कमी त्यांना आठवेल की, बॉबी देओल त्यांना भेटायला आला होता.'
5 / 10
'काम मागण्यात मला कोणतीही लाज वाटत नाही, कारण एक अभिनेता असल्याच्या नात्याने हे पाऊल उचलणं आवश्यक होतं.'
6 / 10
बॉलिवूडमधील बदलांबद्दल बोलताना बॉबी म्हणाला की, त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला कामाच्या संधी अनेकदा कोणत्याही संघर्षाशिवाय उपलब्ध होत होत्या.
7 / 10
'इंडस्ट्रीमध्ये कलाकारांची संख्या वाढत असल्याने स्पर्धाही वाढली आहे, ज्यामुळे भूमिका मिळवणं कठीण झालं आहे.'
8 / 10
'एक काळ होता जेव्हा लोक मला काम द्यायचे, पण आता इंडस्ट्री वेगळी आहे' असं बॉबी देओलने म्हटलं आहे.
9 / 10
बॉबी देओलची आश्रम ही वेब सीरिज खूप गाजली आहे. त्याच्या भूमिकेने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं.
10 / 10
टॅग्स :बॉबी देओलबॉलिवूड