Join us
Daily Top 2Weekly Top 5

IN PICS: ना प्लान होता, ना अंगठी...थेट रिचाला प्रपोज करायला पोहोचला होता ‘गुड्डू पंडित’

By रूपाली मुधोळकर | Updated: October 15, 2020 15:15 IST

1 / 11
बॉलिवूड अभिनेता अली फजल आज 34 वर्षांचा झाला. 1986 साली आजच्याच दिवशी अलीचा जन्म झाला होता. बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण करणाºया अलीबद्दल काही खास गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 / 11
अलीने 2009 साली ‘एक ठो चान्स’ या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. यानंतर अली ‘थ्री इडियट्स’मध्ये कॅमिओ रोल करताना दिसला.
3 / 11
2011 मध्ये ‘ऑलवेज कभी कभी’ या सिनेमात त्याची वर्णी लागली आणि यानंतर फुकरे, बात बन गई, बॉबी जासूस, फुकरे-रिटर्न्स यासारखे अनेक सिनेमे त्याच्या नावावर जमा झालेत.
4 / 11
बॉलिवूडच नाही तर हॉलिवूड चित्रपटांतही त्याने दर्जेदार भूमिका साकारल्या. द अदर एंड ऑफ द लाईन, व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अब्दुल, फ्युरियस 7 अशा चित्रपटात त्याने काम केले.
5 / 11
लवकरच तो ‘डेथ ऑन द नाइल’ या हॉलिवूड सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचे शूटींग पूर्ण झाले आहे.
6 / 11
2018 मध्ये प्रदर्शित ‘मिर्झापूर’ या वेबसीरिजने अलीला एक वेगळी ओळख दिली. या त्याने गुड्डू पंडित ही भूमिका अशी काही जिवंत केली की तो याच नावाने लोकप्रिय झाला.
7 / 11
‘मिर्झापूर’च्या दुसºया सीझनमध्येही अली दिसणार आहे. ‘मिर्झापूर 2’ येत्या 23 ऑक्टोबरला रिलीज होत आहे.
8 / 11
अली फजल गेल्या अनेक वर्षांपासून रिचा चड्ढासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. लवकरच दोघे लग्न करणार आहेत.
9 / 11
अलीने रिचाला कसे प्रपोज केले होते? तर बिना अंगठीचे. होय, खुद्द अलीने याबद्दल एका मुलाखतीत सांगितले होते. ‘मी रिचाला प्रपोज केले. पण यासाठी मी कहीही प्लान केला नव्हता. मी तिला प्रपोज करायला गेलो तेव्हा माझ्याजवळ अंगठीही नव्हती. फक्त हीच योग्य वेळ आणि ठिकाण आहे, एवढेच मला माहित होते,’ असे अलीने सांगितले होते.
10 / 11
रिपोर्टनुसार, रॉबर्ट डाऊनी (ज्युनिअर)चा ‘चॅप्लिन’ हा सिनेमा पाहत असताना रिचाने अलीला प्रपोज केले होते. त्यावेळी अलीने काहीही उत्तर दिले नव्हते. यानंतर तीन महिन्यांनी अलीने रिचाला प्रपोज केले होते.
11 / 11
अली व रिचा बॉलिवूडचे बिनधास्त कपल म्हणून ओळखले जाते. दोघेही बिनधास्त एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
टॅग्स :अली फजलरिचा चड्डा