Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 15:13 IST
1 / 10Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'मधून मराठमोळ्या प्रणित मोरेची एक्झिट झाल्यामुळे चाहते नाराज आहेत. प्रणित कॅप्टन झाल्यानंतर लगेचच त्याला बिग बॉसचं घर सोडावं लागलं. 2 / 10डेंग्यू झाल्याने प्रकृतीच्या कारणास्तव प्रणित मोरेने 'बिग बॉस १९'च्या घराचा निरोप घेतल्याची माहिती आहे. पण, प्रणितला पुन्हा 'बिग बॉस १९'च्या घरात बघण्यासाठी चाहते आतुर आहेत. 3 / 10यादरम्यानच आता चर्चा रंगली आहे ती प्रणित मोरेला 'बिग बॉस १९'साठी मिळालेल्या मानधनाची. 4 / 10'बिग बॉस १९'मधील सर्व स्पर्धकांमध्ये प्रणितला सगळ्यात कमी मानधन मिळाल्याचं बोललं जात आहे. 5 / 10मीडिया रिपोर्टनुसार, आता घरात राहिलेल्या सदस्यांपैकी गौरव खन्नाला सगळ्यात जास्त मानधन मिळालं आहे. गौरव खन्नाने एका आठवड्यासाठी तब्बल १७.५ लाख इतकी फी घेतली आहे. 6 / 10तर अमाल मलिकला ८.७५ लाख रुपये मानधन देण्यात येतं. अश्नूर कौर एका आठवड्यासाठी ६ लाख रुपये घेते. 7 / 10तर तान्या मित्तल, अभिषेक बजाज यांना ३ ते ६ लाख इतकी फी देण्यात आली आहे. 8 / 10फरहाना भट आणि कुनिका सदानंद यांना २-४ लाख रुपये मानधन मिळत आहे. तर नीलम गिरी १-२ लाख रुपये फी घेते. 9 / 10मीडिया रिपोर्टनुसार, सगळ्यात कमी मानधन हे मृदुल तिवारी आणि प्रणित मोरेला देण्यात आलं आहे. 10 / 10म्हणजे प्रणित मोरेला नीलमपेक्षाही कमी म्हणजे जेमतेमच पैसे हिंदी बिग बॉससाठी मिळाले आहेत. पण, याचा आकडा समोर आलेला नाही.