Join us
Daily Top 2Weekly Top 5

अबब! भूमी पेडणेकर रणवीर सिंहबाबत 'हे' काय म्हणाली, दीपिकाला कसं वाटेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 16:30 IST

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरला वाटतं की, रणवीर सिंह अभिनेता नसता झाला तर एक चांगला सेक्सॉलॉजिस्ट झाला असता. भूमी नेहा धुपियाचा टॉक शो नो फिल्टर विथ नेहामध्ये गेली होती. यात भूमी पेडणेकर रणवीरबाबत बोलताना म्हणाली की, 'रणवीर एक चांगला सेक्सॉलॉजिस्ट होऊ शकला असता'.
2 / 8
भूमी सध्या तिचा डॉली किट्टी आणि चमकते सितारे सिनेमाचं सक्सेस एन्जॉय करत आहे. ज्यात तिने अभिनेत्री कोंकणा सेन शर्मासोबत काम केलं आहे.
3 / 8
नेहाच्य चॅट शोमध्ये भूमीला विचारण्यात आले की, तिने अशा अभिनेत्याचं नाव सांगावं जो अभिनेत्यापेक्षा अधिक यशस्वी सेक्सॉलॉजिस्ट बनला असता. यावर भूमीने थेट रणवीर सिंहचं नाव घेतलं.
4 / 8
भूमी म्हणाली की, 'मला वाटतं की, त्याच्याकडे काही कमाल पद्धती असतील'. या मुलाखतीत भूमीने रणवीरच्या बॅंड बाजा बारातच्या मुलाखतीचा किस्सा सांगितला.
5 / 8
भूमीने सांगितले की, आयुष्मान खुराणा स्टारर 'दम लगा के हैशया' सिनेमातून डेब्यू करण्याआधी ती एक कास्टिंग डिरेक्टर होती. ती म्हणाली की, 'मी सुद्धा ऑडीशनमध्ये होती आणि तो व्हिडीओ यूट्यूबवर उपलब्ध आहे'.
6 / 8
तिने सांगितले की, 'फारच मजा आली होती. त्याची एनर्जी कमाल आहे. मी तर इम्प्रेस झाली होती. मी त्याच्या एनर्जीने फारच प्रभावित झाली होते. मी विचार करत होते की, हे देवा हा काय कमाल अभिनेता आहे आणि काय कमालीची ऊर्जा आहे'.
7 / 8
भूमीने सांगितले की, तिचं यश राज फिल्म्सचा डायरेक्टर शानसोबत बोलणं झालं होतं. तिने सांगितले की रणवीर वास्तवात तसाच आहे जसा तुम्हाला दिसतो.
8 / 8
भूमी पेडणेकरच्या कामाबाबत सांगायचं तर ती लवकरच जी अशोकच्या हॉरर थ्रीलर फिल्म दुर्गावतीमध्ये दिसणार आहे. असे सांगितले जात आहे की, हा सिनेमा तेलुगू सिनेमाचा रिमेक असेल.
टॅग्स :भूमी पेडणेकर रणवीर सिंगबॉलिवूडनेहा धुपिया