Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मोटी गेंडी तर कोणी...', बॉडीशेमिंगवरुन नको नको ते ऐकावं लागलं; कॉमेडी क्वीन भारती सिंहचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 15:20 IST

1 / 7
कॉमेडी क्वीन भारती सिंह (Bharti Singh) नेहमी तिच्या विनोदी स्वभावाने सर्वांना खळखळून हसवते. सर्वांना हसवणारी भारती प्रत्यक्षात मात्र मोठ्या कष्टातून आणि गरिबीतून वर आली आहे.
2 / 7
भारतीला अनेक जण तिच्या जास्त वजनामुळे चिडवतात. अनेकदा तर भारती स्वत:च तिच्या वजनाची खिल्ली उडवते. मात्र गंमत करणं वेगळं आणि बोचरी टीका करणं वेगळं. भारतीला आयुष्यात प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. नुकताच एका मुलाखतीत तिने यासंदर्भात खुलासा केला आहे.
3 / 7
भारती म्हणाली, 'करिअरच्या सुरुवातीचे दिवस खूपच कठीण होते. अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मला शरीरावरुन खूप टोमणे ऐकावे लागायचे. अनेक नावांनी मला बोलवले जायचे.'
4 / 7
ती म्हणाली,'मला मोटी, गेंडी, तर कोणी हत्ती अशा नावाने देखील बोलवत होता. मी जाड आहे हे मी मान्य केलेच आहे. मी कोणा हलवाईची मुलगी नाही मी तर मध्यमवर्गीयही नाही.'
5 / 7
मी खूपच गरिबीतून आले आहे आणि त्याचप्रकारचे खाऊन मी जाड झाले आहे यात माझी काय चूक? जाडेपणावर मी कायम खूश होते आजही आहे आणि यापुढेही राहिल असंही भारती म्हणाली.
6 / 7
भारतीने हर्ष लिंबाचीया सोबत लग्न केले तेव्हाही तिला ट्रोल केले गेले होते.जाड मुलीने जाड मुलाशीच लग्न केले पाहिजे असं लोक म्हणत होते. मला माहित आहे मी जाड आहे आणि हे माझं आयुष्य आहे त्यामुळे मी कोणाशी लग्न करायचं हे मी ठरवेन असंही ती म्हणाली.
7 / 7
भारतीने २०१७ मध्ये हर्ष लिंबाचिया सोबत लग्न केले. हर्ष लेखक आणि दिग्दर्शक आहे. तर गेल्या वर्षीच भारतीने गोंडस मुलाला जन्म दिला. मुलासोबतचे क्युट व्हिडिओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.
टॅग्स :भारती सिंगट्रोलसोशल मीडिया