चोरीचा आरोप ते आत्महत्येचा प्रयत्न, 'या' बंगाली ब्युटीचा बॉलिवूडमध्येही दबदबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 16:10 IST
1 / 7बंगाली सिनेमाची आघाडीची अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी (Swastika Mukherjee) आज 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. 13 डिसेंबर 1980 रोजी कोलकात्यात जन्मलेली स्वस्तिका बंगाली अभिनेता संतू मुखर्जी यांची मुलगी आहे.2 / 7बंगाली टीव्ही मालिका ‘देवदासी’पासून तिच्या अॅक्टिंग करिअरला सुरुवात झाली. 2001 मध्ये ‘हेमंतर पाखी’ या सिनेमातून तिने डेब्यू केला. पुढे 2008 मध्ये तिने ‘मुंबई कटिंग’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्येही डेब्यू केला. 3 / 7स्वस्तिकावर कधीकाळी चोरीचा आरोप झाला होता.2014 मध्ये सिंगापूरमध्ये फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. तिथे ती ज्वेलरी मॉलमध्ये गोल्ड इअर रिंग्स बॅगमध्ये ठेवताना पकडली गेली होती. 4 / 7यानंतर ते इयररिंग्स तिने खरेदी केल्याचं आणि आपल्याजवळ त्याची पावती असल्याचं स्पष्टीकरण तिने दिलं होतं. पण तिला पावती दाखवताच आली नाही. 5 / 72014 मध्ये स्वस्तिका अचानक चर्चेत आली होती. बॉयफ्रेन्ड सुमनच्या अटकेविरोधात तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.6 / 7वयाच्या 18 व्या वर्षीच स्वस्तिकाने गायक प्रमित सेनशी लग्न केले होते. स्वस्तिकाने पतीवर मारहाण तसेच गरोदरपणात घरात बंद करून ठेवल्याचा आरोप केला होता. 2007 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला. 7 / 7स्वस्तिका मुखर्जीने सुशांतसिंह राजपूतसोबत 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यामध्ये तिने सुशांतसोबत किसींग सीनही दिला होता. यानंतर तिने 'कला','दिल बेचारा' या सिनेमांमध्येही भूमिका साकारली.