Join us  

बप्पी लहरींनी सोन्यासह 'या' गोष्टींमध्येही केली होती आर्थिक गुंतवणूक; जाणून घ्या त्यांची एकूण संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 10:02 AM

1 / 11
संगीत कलाविश्वातील मोठं नाव बप्पी लहरी यांचं बुधवारी निधन झालं. मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे सध्या त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टींची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
2 / 11
बप्पी लहरींना ज्याप्रमाणे गाण्याची आवड होती. तितकंच त्यांचं सोन्यावरही प्रेम होतं. त्यामुळे ते त्यांच्या मधूर आवाजासोबतच दागदागिन्यांमुळेही कायम चर्चेत असायचे.
3 / 11
बप्पी लहरी यांना सोन्याप्रमाणेच गाड्या, घर यांच्यात गुंतवणूक करण्याचीही विशेष आवड होती.त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती किती होती आणि त्यांचं आलिशान घर कसं आहे ते पाहुयात.
4 / 11
बप्पी लहरी यांचं कोलकात्ता येथे घर असून ते त्यांच्या संपूर्ण कुटुंबात एकत्रितपणे राहतात.
5 / 11
बप्पी लहरी यांच्या कुटुंबात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असे सदस्य आहेत.
6 / 11
बप्पी लहरी कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही तितकेच सक्रीय होते. त्यामुळे अनेकदा ते सोशल मीडियावर त्यांच्या घराचे काही फोटो शेअर करायचे.
7 / 11
या आलिशान घरात बप्पी लहरी यांची एक स्वतंत्र खोली असून त्यात त्यांच्या संगीतविश्वातील काही आठवणी फोटो फ्रेमच्या माध्यमातून जोपासण्यात आल्या आहेत.
8 / 11
बप्पी लहरी यांचं घर कोणत्याही पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नाही. त्यांचं घर प्रचंड आलिशान आहे.
9 / 11
बप्पी लहरी यांनी २०१४ मध्ये भाजपाकडून लोकसभेची निवडणूक लढली होती. यावेळी त्यांनी सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या एकूण संपत्तीचा उल्लेख केला होता.
10 / 11
प्रतिज्ञापत्रात बप्पी लहरींनी सादर केलेल्या संपत्तीमध्ये त्यांच्याकडे जवळपास १२ कोटींपेक्षा जास्त स्थावर मालमत्ता होती असल्याचं नमूद करण्यात आलं होतं.
11 / 11
बप्पी लहरी यांना आलिशान गाड्यांचीही आवड होती. त्यांच्याकडे ऑडी, बीएमडब्लू सारख्या लक्झरी गाड्यादेखील होत्या.
टॅग्स :बप्पी लाहिरीसेलिब्रिटीबॉलिवूड