Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाभारतातील या कलाकारांनी घेतला जगाचा निरोप, नावं वाचून तुमच्या डोळ्यात येईल पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 15:13 IST

1 / 5
महाभारतात विदुराची भूमिका विरेंद्र राजदानने साकारली होती. या मालिकेसोबत त्यांनी गांधी, जंजीर यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांचे निधन २००३ मध्ये झाले.
2 / 5
महाभारतात कंसची भूमिका गोगा कपूर यांनी साकारली होती. गोगा यांनी ८०-९० च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. कयामत से कयामत तक, शहंशाह, तुफान, कभी हाँ कभी ना यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये ते झळकले होते. २०११ मध्ये त्यांचे निधन झाले. ते अनेक वर्षांपासून आजारी होते.
3 / 5
महाभारत या मालिकेत नकुलाच्या भूमिकेत आपल्याला समीर चित्रेला पाहायला मिळाले होते. या मालिकेनंतर आमिर खानच्या दिल है के मानता नही आणि शाहरुख खानच्या राजू बन गया जेंटलमन या प्रसिद्ध चित्रपटात तो झळकला होता. समीरचे काही वर्षांपूर्वी निधन झाले.
4 / 5
महाभारतात कृपाचार्य यांच्या भूमिकेत धर्मेश तिवारी यांना आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यांनी महाभारतासोबतच विक्रम आणि बेताल या मालिकेत काम केले होते. २०१४ मध्ये त्यांचे निधन झाले.
5 / 5
राजेश विवेक यांनी महाभारत या मालिकेत वेद व्यास यांची भूमिका साकारली होती. यासोबतच विवेक यांनी लगान, बंटी और बबली, त्रिदेव यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांचे निधन २०१६ मध्ये झाले.
टॅग्स :महाभारत