1 / 9अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि आदर्श जोडी. अगदी पावलोपावली त्यांनी एकमेकांची साथ दिली आहे. 2 / 9नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी पत्नी निवेदिता सराफ यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्याबद्दल बोलताना ते भावुक झाले. 3 / 9'ती आहे म्हणून मी आहे. निवेदिता नसती तर भरकटलो असतो', असं अशोक सराफ अमुक तमुकला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 4 / 9पुढे ते म्हणाले, 'मला घराकडे बघावच लागत नाही. मी फक्त काम करतो. सगळा घरचा भार तिने घेतलाय. सगळं घरचं काम ती करते'. 5 / 9'माझे व्यवहार ती बघते. माझे फोन घेण्यापासून सगळं ती करते. मला काहीच करावं लागत नाही. ती एक अभिनेत्री असूनही काम करत असूनही अजूनही सगळं करतं'. 6 / 9'माझी सध्या एका बाजूला मान दुखते. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण, रोज रात्री ती मलम लावल्याशिवाय झोपायची नाही'. 7 / 9'ती माझ्यापेक्षा उशीरा घरी येते. मी ६-६.३० वाजता घरी येतो. ती ११ शिवाय घरी येत नाही. तुम्हाला माणूस काय आहे हे कळलं की नातं आणखी घट्ट होत जातं'.8 / 9'तुम्ही माणूस काय आहे हे ओळखलं पाहिजे. माझ्या आयुष्यात मी अनेक गोष्टी केल्या. पण सगळ्यात चांगली गोष्ट जर कुठली केली असेल तर मी तिच्याशी लग्न केलं'. 9 / 9'आमची भांडणही होतात. पण, कितीही भडकलो तरी पहिली ती येते. आणखी काय पाहिजे??', असंही अशोक सराफ म्हणाले.