हृदय तुटलं अन् आशिषचा मोठा निर्णय, घटवलं ४० किलो वजन, शाहरुख खानचा 'तो' सल्ला ठरला गेमचेंजर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 11:10 IST
1 / 10तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला आशिष चंचलानी सध्या त्याच्या नवीन वेब सीरिज 'एकांकी चॅप्टर टू' मुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये आशिषने फक्त अभिनेता म्हणून काम केले नाही, तर तो दिग्दर्शक, लेखक आणि कास्टिंग डायरेक्टर अशा चार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसला आहे. 2 / 10'एकांकी चॅप्टर टू'च्या प्रमोशननिमित्तानं आशिष विविध ठिकाणी मुलाखती देत आहेत. नुकतंच दैनिक भास्करशी संवाद साधताना तब्बल ४० किलो वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल त्यानं सांगितलं. 3 / 10आशिषच्या आयुष्यात एक काळ असा होता, जेव्हा तो प्रचंड दुःखी होता. त्याचदरम्यान, बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान याला भेटल्यानंतर त्याच्या आयुष्यातील 'फॅट टू फिट' प्रवासाला सुरुवात झाली. आशिषने सांगितले की, शाहरुख खानने माझ्या पोटाला हात लावला आणि मला पोट कमी करण्याचा सल्ला दिला.4 / 10तो म्हणाला, 'त्या काळात माझं हृदय तुटलं होतं, तब्येतही खूप खराब होती. सर्व आशा संपल्या होत्या. मग एका दिवशी मी ठरवलं की आता स्वतःला खालून वर आणायचं आहे'.5 / 10आशिषने हार न मानता स्वतःला पुन्हा उभे करण्याचा निर्णय घेतला. हे परिवर्तन त्याने कोणताही गाजावाजा न करता शांतपणे पूर्ण केले. आशिषने स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सगळ्यांपासून दूर राहणे पसंत केले. त्याने फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले.6 / 10या कठोर परिश्रमानंतर जेव्हा आशिष लोकांसमोर आला, तेव्हा त्याचे ४० किलो वजन कमी झालेले पाहून सगळ्यांनी त्याचं खूप कौतुक केलं.7 / 10वजन कमी करण्याच्या या प्रवासाने आशिषच्या आत्मविश्वासातही मोठा बदल घडवला. आज पूर्वीपेक्षा अधिक आनंदी आणि समाधानी असल्याचं त्यानं सांगितलं. 8 / 10 एक मजेदार अनुभव सांगताना आशिष म्हणाला, 'एकदा एका लग्नात एका मुलीने मला थेट प्रपोज केल. माझे वजन माझ्या आयुष्यातील ९० टक्के जास्त होते, त्यामुळे मला अशा प्रकारचे कौतुक कधीच मिळाले नाही. आता मी स्वतःवर आधीपेक्षा जास्त आनंदी आहे' 9 / 10आशिषनं वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य डाएट फॉलो केले. त्याने कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग, लेग्ज, पंचिंग बॅगसह बॉक्सिंग, तसंच रोप वर्कआऊट नियमित केले. याशिवाय कार्डिओ, सायकलिंग आणि रनिंग या व्यायामावरही भर दिला.10 / 10आशिषने आपल्या जेवणामधील आहारावर नियंत्रण आणले. फायबरयुक्त संतुलित आहाराचे नियमित पालन केले. प्रोटीनमुळे मसल्स मजबूत होतात तर फायबर खाल्ल्याने त्याला पचनक्रियेसाठी योग्य मदत झाली. आशिषला यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळाली.