Join us
Daily Top 2Weekly Top 5

मलायका अरोरासोबतच्या नात्यावर अर्जुन कपूरचा मोठा खुलासा, म्हणाला - 'आता रात्री...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 16:43 IST

1 / 7
बोनी कपूर यांचा मोठा मुलगा आणि अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्याच्या 'कुत्ते' चित्रपटाच्या प्रमोशनमुळे मीडियाशी संवाद साधतो आहे. त्याच्या प्रमोशनल मुलाखतींमध्ये, अभिनेत्याने काम तसेच त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
2 / 7
असाच एक प्रश्न होता की मलायकाने आपल्या आयुष्यात काय बदल घडवून आणले आहेत आणि अर्जुनला तिला डेट केल्यानंतर काय नवीन वाटते.
3 / 7
यावर अर्जुनने उत्तरात सांगितले की, मलायकाला डेट केल्यानंतर आता तो रात्री शांतपणे झोपू शकतो.
4 / 7
मलायकाने त्याच्या आयुष्यात एन्ट्री केल्यानंतर त्याला रात्री शांत झोप लागते. तो म्हणतो की तो जेव्हा झोपायला जातो आहे आणि सकाळी उठतो तेव्हा तो आनंदी असतो आणि याचे श्रेय मलायकाला जाते.
5 / 7
अर्जुन कपूरचा चित्रपट 'कुत्ते' नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद मिळत आहे.
6 / 7
मात्र मलायकाला त्याचा चित्रपट खूप आवडला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे चित्रपट आणि अर्जुनच्या कामाचे कौतुक केले होते.
7 / 7
मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर