Join us

Archana Gautam: बिग बॉसच्या घरात अवतरली हॉट राजकारणी, बिकिनी फोटोंची चर्चा, काँग्रेसकडून लढवली होती निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 13:27 IST

1 / 7
बिग बॉग १६ च्या पर्वाला सुरुवात झाली आहे. यावेळी अनेक दिग्गजांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. मात्र या सर्वांमध्ये बिकिनी गर्ल म्हणून प्रसिद्ध झालेली एक हॉट महिला राजकारणी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तिच्या हॉटनेससमोर इतर स्पर्धक हे पानी कम असल्याचा दावा तिचे फॅन्स करत आहेत. या अभिनेत्री आणि राजकारण्याचं नाव आहे अर्चना गौतम.
2 / 7
बिग बॉसला सुरुवात झाल्यानंतर केवळ दोन दिवसांमध्येच अर्चना गौतम हिने बिग बॉसच्या घरातील इतर खेळाडींसोबत वादावादी सुरू केली आहे. तिने सुंबुल तौकीर खान हिची तिच्या नावावरून थट्टा उडवली. तर अब्दु रोजिकच्या उंचीवरून त्याची खिल्ली उडवली.
3 / 7
अर्चना गौतम हिने घराची कॅप्टन निमृत कौर अहलुवालिया हिच्यासोबतही पंगा घेतला. मात्र अर्चना बिग बॉसच्या घरातील तिच्या बोल्ड अंदाजाने फॅन्सना घायाळ करत आहे. अर्चना ही तिच्या पर्सनल लाईफमध्येही तेवढीच हॉट आणि बोल्ड आहे. सध्या बिग बॉसमधील सर्वात हॉट स्पर्धक म्हणून तिचा उल्लेख केला जात आहे.
4 / 7
अर्चनाचे अनेक बिकिनी फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये तिची परफेक्ट फिगर स्पष्टपणे दिसते. अर्चनाच्या या हॉटनेसने अनेकांना घायाळ केले आहे. आता अर्चनाने बिग बॉसच्या घरात खूप दिवस राहावे, अशी त्यांची इच्छा आहे.
5 / 7
मुळची मेरठ येथील परतपूर येथील रहिवासी असलेल्या अर्चना गौतम हिने काही वर्षांपूर्वी मॉडेलिंगमधून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने मिस यूपीचे विजेतेपदही पटकावले होते.
6 / 7
२७ वर्षीय अर्चना गौतमने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तिने २०१५ मध्ये ग्रेट ग्रँड मस्ती चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर अर्चना गौतम हिने हसीन पारकर, बरोटा कंपनी यासारख्या चित्रपटातही काम केलं होतं.
7 / 7
दरम्यान, अर्चना गौतम हिने २०२१ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. तसेच २०२२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मेरठमधील हस्तिनापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होत. तिच्यासाठी प्रियंका गांधी यांनीही रोड शो केला होता. मात्र त्यांना केवळ १५१९ मतांवर समाधान मानावे लागले होते. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते.
टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीटेलिव्हिजनराजकारण