1 / 7रब ने बना दी जोडी चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अनुष्का शर्मा आज ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी आज आम्ही तुम्हाला तिचे लहानपणीचे काही खास फोटो दाखवत आहोत, जे तुम्ही याआधी कधीही पाहिले नसतील. 2 / 7हा फोटो अनुष्का शर्माच्या लहानपणीच्या वाढदिवसाचा आहे. त्यामध्ये कुटुंबीय छोट्या अनुष्काचं औक्षण करताना दिसत आहेत. 3 / 7या फोटोमध्ये अनुष्का तिच्या भावासोबत बसलेली दिसत आहे. तसेच कॅमेऱ्याकडे पाहून पोझ देताना दिसत आहेत. या फोटोवरून तिला लहानपणापासूनच फोटो काढण्याची आवड होती, असे दिसत आहे. 4 / 7दोन वेण्या घातलेली अनुष्का शर्मा या फोटोमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये तिने लाइट कलरचं फ्रॉक घातलं आहे. तसेच दोन वेण्या बांधल्या आहेत. त्याबरोबरच तिने गोल्डन कलरची बिंदी घातलेली आहे. फोटोंमध्ये अनुष्का कुटुंबीयांसोबत दिसत आहे. 5 / 7आईच्या मांडीवर बसलेली अनुष्का एखाद्या छोट्याशा परीसारखी दिसत आहे. पिंक कलरचा फ्रॉक घातलेली अनुष्का तिच्या वााढदिवसाचा केक कापताना दिसत आहे. 6 / 7या फोटोमध्ये अनुष्का शर्मा तिच्या वडीलांच्या मांडीवर बसली आहे. तर तिची नजर कुठल्यातरी दुसऱ्याच व्यक्तीकडे आहे. हा त्यांच्या नातेवाईकाच्या लग्नातील फोटो असल्याचे दिसत आहे. 7 / 7अनुष्का शर्मा आणि तिच्या भावामध्ये लहानपणापासूनच उत्तम बाँडिंग लहानपणापासूनच आहे. हा फोटो त्याचं उदाहरण आहे.