1 / 7Cannes 2026: फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने हजेरी लावत कोकणची मान उंचावली. 2 / 7अंकिताने कान्सच्या रेड कार्पेटसाठी मराठमोळा लूक केला होता. गुलाबी रंगाची पैठणी साडी नेसून ती रेड कार्पेटवर अवतरली. 3 / 7अंकिताच्या लूकमधूनही कोकणची झलक पाहायला मिळाली. तिच्या पदरावर नारळाच्या झाड कोरलेलं होतं. 4 / 7केसांचा बन बांधून अगदी साधा लूक तिने केला होता. गळ्यात चोकर आणि मोत्याचे दागिने तिने घातले होते.5 / 7कोकण हार्टेड गर्लला कान्सच्या रेड कार्पेटवर पाहून चाहतेही सुखावले. अंकिताने शेअर केलेल्या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. 6 / 7'कोकणची शान', 'तू कोकणी असल्याचं अभिमान' अशा कमेंट चाहत्यांनी अंकिताच्या या फोटोंवर केल्या आहेत. 7 / 7अंकिताचा कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील लूक चाहत्यांनाही आवडला आहे. अभिजात मराठी ओटीटी जागतिक लाँचसाठी अंकिता कान्समध्ये सहभागी झाली होती.