Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतच्या निधनाला ३ महिने पूर्ण; अंकिता लोखंडे भावूक होऊन म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 14:39 IST

1 / 10
सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आता ३ महिने पूर्ण झाले आहेत. पण अजूनही त्याच्या मृत्यूचं कारण समोर आलेलं नाही. दुसरीकडे फॅन्ससोबतच सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडेचा अजूनही यावर विश्वास बसत नाहीय की, सुशांत आता नाही. अंकिताने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून सुशांतची आठवण तर काढलीच, सोबतच एकदा पुन्हा न्यायाची मागणी केलीये.
2 / 10
अंकिताने ट्विटरवर लिहिले की, 'वेळ किती लवकर निघून जातो. जगणं आपल्या वेगाने सुरू राहतं, पण आपल्या प्रिय लोकांच्या काही आठवणी कधीही विसरता येत नाहीत. सुशांत तू नेहमी आमच्या आठवणीत आणि विचारांमध्ये राहिशील' #Justice4SSRIsGlobalDemand #itsalready3monthstoday '
3 / 10
सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने ट्विटरवर #Justice4SSRIsGlobalDemand नावाने एक कॅम्पेन सुरू केलं आणि प्रश्न विचारला की, सत्य बाहेर येण्यासाठी आता आणखी किती वेळ लागेल. या कॅम्पेनला अंकिता लोखंडे आणि इतर इनेक सेलिब्रिटींनीही पाठिंबा दिलाय. सुशांतच्या फॅन्सकडूनही सतत न्यायाची मागणी केली जात आहे.
4 / 10
5 / 10
अंकिता सुशांतच्या फार जवळ होती. 'पवित्र रिश्ता' मालिकेदरम्यान सुशांत आणि अंकिता एकमेकांच्या प्रेमात पडले होते. आणि पुढे ६ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. तरी अंकिताने स्वत:ला कधीही सुशांतच्या परिवारापासून वेगळं केलं नाही. या स्थितीतही अंकिता सुशांतच्या परिवारासोबत उभी आहे. सतत न्यायाची मागणी करत आहे.
6 / 10
सुशांतसाठी या लढाईत अंकितावर कितीतरी आरोप लागले. रिया चक्रवर्ती म्हणाली होती की, अंकिताच्या फ्लॅटची ईएमआय सुशांत भरत होता. त्यानंतर शिबानी दांडेकरनेही अंकितावर २ सेकंदाची प्रसिद्धी मिळवण्याचा आरोप केला होता. पण अंकिता मागे हटली नाही आणि सडेतोड उत्तर दिलं.
7 / 10
अंकिता आता सुशांतचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी समोर आली आहे. सुशांतचं स्वप्न होतं की, तो १ हजार झाडे लावणार. हेच त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंकिताने तिच्या घरापासून सुरूवात केली आहे. सोबतच त्याचे फॅन्सही यात सहभागी होणार आहेत.
8 / 10
नुकतीच अंकिता लोखंडेने एक लांबलचक पोस्ट शेअर केली होती. मुळात ते एक ओपन लेटर होतं, जे अंकिताने रिया चकवर्तीच्या अटकेनंतर लिहिलं होतं. त्यात तिने स्पष्ट केलं की, ती कधीच म्हणाली नाही की, सुशांतचा मर्डर झाला आणि त्याने आत्महत्या केली नाही. अशात अभिनेत्री शिबानी दांडेकरने रियाची बाजू घेत अंकितावर पलटवार केला होता. ती म्हणालली होती की, अंकिताला रियाबाबत बोलून दोन सेकंदात प्रसिद्धी हवी आहे. आता शिबानीच्या या आरोपावर अंकिताने उत्तर दिलंय.
9 / 10
आपल्या लेटरमध्ये अंकिताने तिच्या करिअरबाबत सांगितलं आहे. ती म्हणाली की, टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांना कधीही कमी समजू नये. यात तिने तिच्या पवित्र रिश्तापासून सुरू झालेल्या करिअरचा उल्लेख केलाय. ती पुढे म्हणाली की, कशाप्रकारे ती अर्चनाच्या भूमिकेशी जुळली आणि आजही जुळलेली आहे. नंतर तिने मणिकर्णिका आणि बागी ३ मध्ये काम करण्याची संधी मिळाल्याबाबत सांगितलं. शेवटी अंकिताने हेही सांगितलं की, कशाप्रकारे १७ वर्षांपासून मनोरंजन इंडस्ट्रीचा भाग आहे.
10 / 10
शिबानीने पुढे लिहिले, ‘या पुरूषप्रधान व्यवस्थेला ओळखण्याऐवजी अंकितासारख्या महिला या व्यवस्थेच्या लाटेवर स्वार होऊन स्वत:चा अजेंडा पुढे नेत आहे. सुशांत रियावर प्रेम करायचा, हे अंकिताने स्वीकारायला हवे.’
टॅग्स :अंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूतबॉलिवूड