Join us
Daily Top 2Weekly Top 5

जया बच्चन यांच्या धाकट्या जाऊबाईंना पाहिलंय का? वयाची पन्नाशी ओलांडूनही राहतात प्रचंड ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 19:12 IST

1 / 9
बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्यांच्या पर्सनल लाइफचीही सोशल मीडियावर कायमच चर्चा होत असते.
2 / 9
उत्तम अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्थान निर्माण करणाऱ्या बिग बींच्या कुटुंबातील निम्म्याहून अधिक सदस्य बॉलिवूडमध्ये सक्रीय आहेत. या त्यांची पत्नी, मुलगा, सून यांचा समावेश होतो.
3 / 9
बिग बींच्या कुटुंबाविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. परंतु, त्यांच्या धाकट्या भावाविषयी व त्याच्या कुटुंबाविषयी फार मोजक्या जणांना माहित आहे. त्यामुळेच आज बिग बींच्या धाकट्या भावजयेबद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात.
4 / 9
बच्चन कुटुंबाची मोठी सून जया बच्चन या कलाविश्वाप्रमाणेच राजकारणातही सक्रीय आहेत. परंतु, त्यांची धाकटी जाऊ रमोला बच्चन यादेखील त्यांच्यापेक्षा कमी नाही. रमोलादेखील एक बिझनेस वूमन आहेत. परंतु. त्यांच्या विषयी फारसं कोणाला माहित नाही.
5 / 9
रमोला बच्चन ही बिग बींचा धाकटा भाऊ अजिताभ याची पत्नी आहे. त्या एक बिझनेस वूमन असून त्यांचा रनवे राइजिंग एग्जिबिशन, रनवे ब्राइडल एग्जिबिशन हे काही ब्रँड आहेत.
6 / 9
रमोला यांची कॉन्सेप्ट्स नामक एका कंपनी असल्याचंही सांगण्यात येतं. २००७ दिल्लीत स्थायिक होण्यापूर्वी रमोला लंडनमध्ये राहत होत्या.
7 / 9
रमोला यांनी वयाची पन्नाशी पार केली आहे. मात्र, आजही त्या प्रचंड ग्लॅमरस दिसतात.
8 / 9
रमोला सोशल मीडियावर सक्रीय असून त्यांचे ग्लॅमरस फोटो त्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असतात.
9 / 9
रमोला यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला एका इव्हेंटमधील फोटो
टॅग्स :जया बच्चनअमिताभ बच्चनबॉलिवूडसेलिब्रिटी