Join us
Daily Top 2Weekly Top 5

बघता बघता ८१ वर्षांचे झाले अमिताभ बच्चन; मध्यरात्री 'जलसा'बाहेर मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 10:03 IST

1 / 9
बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज ८१ वा वाढदिवस साजरा होतोय. आपल्या लाडक्या अभिनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्रीही मोठी गर्दी जमली होती. अमिताभ यांच्या मुंबईतील जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांनी मध्यरात्री वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे, अमिताभ यांनीही बंगल्याच्या बाहेर येत चाहत्यांना हात दाखवून अभिवादन व नमस्कार केला.
2 / 9
अमिताभ यांच्या मुंबईतील जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांनी मध्यरात्री वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे, अमिताभ यांनीही बंगल्याच्या बाहेर येत चाहत्यांना हात दाखवून अभिवादन व नमस्कार केला.
3 / 9
जुहू येथील अमिताभ बच्चन यांच्या जलसा (Jalsa) निवासस्थानी चाहत्यांकडून केक कापण्यात आला. यावेळी स्वतः अमिताभ चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी जलसा बंगल्याबाहेर आले.
4 / 9
अमिताभ बच्चन दरवर्षी न चुकता वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना भेटत असतात. यंदाची त्यांची 'जलसा'मधून बाहेर येत चाहत्यांची भेट घेतली आहे. चाहत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांनीही त्यांचे फोटो व व्हिडिओ काढले आहेत
5 / 9
सन १९७१ साली आलेल्या आनंद आणि १९७५ साली आलेल्या शोले चित्रपटापासून ते आजतागायत बिग बिंची जादू ७० मिमि पडद्यावर कायम आहे.
6 / 9
बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक कलाकार आले, स्टार झाले आणि निघूनही गेले. मात्र, अमिताभ बच्चन त्यास अपवाद ठरले. आजही चित्रपटातील त्यांची एंट्री टाळ्या अन् शिट्यांची दाद मिळवते.
7 / 9
गेली ५ दशकं म्हणजे ५० वर्षांपासून मनोरंजनाच्या माध्यमातून अमिताभ यांनी घराघरात आणि मनामनात आपलं स्थान पक्क केलंय. त्यामुळे, अमिताभ बच्चन यांनी तीन पिढ्यांच्या मनावर राज्य केलंय.
8 / 9
वडिल, मुलगा आणि नातूही ज्या कलाकाराचा फॅन आहे, घरातील तीन पिढ्या ज्यांच्या कसदार अभिनयाचे आणि सिनेमांचे साक्षीदार आहेत, ते म्हणजे महानायक अमिताभ बच्चन होत.
9 / 9
चाहत्यांच्या कुटुंबातील तीन पिढ्यांना 'आनंद' देत करोडपती बनवणारा महानायक म्हणजे अमिताभ बच्चन होयं. बिग बी आज ८१ वर्षांचे झाले, त्यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा
टॅग्स :अमिताभ बच्चनबॉलिवूडमुंबई