अक्षय खन्नाची आई गीतांजलीही दिसायच्या सुंदर, विनोद खन्नांच्या पहिल्या पत्नीबद्दल माहितीये का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:52 IST
1 / 13'धुरंधर' सिनेमामुळे पुन्हा अक्षय खन्ना हे नाव चर्चेत आलं आहे. 'छावा'मध्ये औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर आता त्याने रहमान डकैतच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.2 / 13अक्षय खन्ना आज लोकप्रियतेच्या शिखरावर असूनही प्रसिद्धीझोतापासून दूरच राहणं पसंत करत आहे. त्याच्या नावाचा गवगवा होत असतानाही तो आपलं काम करुन शांत आयुष्य जगतोय आणि पुढच्या सिनेमाची तयारी करत आहे.3 / 13अक्षय खन्ना हा हँडसम अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा. ७०-८० च्या दशकात विनोद खन्ना हे बॉलिवूडमध्ये आघाडीवर होते. त्याच्या चार्मिंग, हँडसम व्यक्तिमत्वावर तरुणी अक्षरश: भाळल्या होत्या.4 / 13विनोद खन्ना यांनी दोनदा लग्न केलं. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव गीतांजली खन्ना होतं. त्यांनी अक्षय आणि राहुल या दोन मुलांना जन्म दिला होता. 5 / 13अक्षय खन्नाची आई गीतांजली खन्ना यांच्याबद्दल माहितीये का? विनोद खन्ना यांची मुलांच्या जन्मानंतर संन्यास घेतला होता आणि ते काही वर्ष ओशो आश्रमात होते. तेव्हा गीतांजली यांनी एकटीनेच अक्षय आणि राहुलचा सांभाळ केला होता.6 / 13गीतांजली यांचं माहेरचं नाव गीतांजली तलेयारखान होतं. त्या पारसी कुटुंबातल्या होत्या. कुटुंबातून वकिली आणि बिझनेसचा वारसा असताना त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला होता. 7 / 13गीतांजली आणि विनोद खन्ना यांची ओळख कॉलेजमध्ये झाली होती. गीतांजलीला पाहताच विनोद आकर्षित झाले होते. दोघांनी डेटिंगला सुरुवात केली. तोपर्यंत विनोद खन्नांनी बॉलिवूडमध्ये नाव कमावलं नव्हतं. 8 / 13विनोद खन्नांना सुनील दत्त यांनी बॉलिवूडमध्ये मोठी संधी दिली आणि त्यांच्या अभिनय करिअरला कलाटणी मिळाली. यानंतर लगेच काही वर्षांनी दोघांनी लग्न केलं. १९७१ मध्ये त्यांच्या लग्नात अनेक सेलिब्रिटीही उपस्थित होते. 9 / 13एक वर्षानंतर राहुलचा जन्म झाला. तर १९७५ मध्ये अक्षय खन्नाचा जन्म झाला. प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल साधत विनोद खन्ना कायम कुटुंबाला प्राधान्य द्यायचे. त्यांनी रविवारी काम न करण्याचा नियमही बनवला होता. 10 / 13मात्र अचानक विनोद खन्नांनी अध्यात्माचा मार्ग निवडला होता. ते अमेरिकेत राहून फोनवरुनच पत्नी आणि मुलांच्या संपर्कात होते. मुलांचा एकटीने सांभाळ करताना गीतांजली खन्ना यांना अनेक अडचणी आल्या.11 / 13अखेर एक दिवस गीतांजली यांनी विनोद खन्नांना कुटुंब की अध्यात्म यापैकी एकाची निवड करायला सांगितली. यावर त्यांचं काहीच उत्तर न आल्याने गीतांजली यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. १९८५ साली त्यांचा घटस्फोट झाला.12 / 13१९८७ साली विनोद खन्ना पुन्हा भारतात आले. वयाच्या ४३ व्या वर्षी त्यांच्या आयुष्यात कविता दाफ्तरी यांची एन्ट्री झाली. दोघं प्रेमात पडले. १९९० साली त्यांनी लग्न केलं. दोघांना साक्षी हा मुलगा आणि एक मुलगीही आहे. 13 / 13२७ एप्रिल २०१७ रोजी विनोद खन्नांचं कॅन्सरमुळे निधन झालं. तर एका वर्षातच २०१८ साली गीतांजली खन्ना यांनीही जगाचा निरोप घेतला.