मनोज कुमार यांच्या निधनानंतर नात आली चर्चेत, आहे 'या' क्षेत्रात कार्यरत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 14:33 IST
1 / 7मनोज कुमार यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालं. मनोज कुमार यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.2 / 7मनोज कुमार यांच्या कुटुंबासाठी नक्कीच हा दुःखाचा प्रसंग आहे. मनोज यांच्या निधनानंतर त्यांची नात चर्चेत आली आहे. मनोज यांच्या नातीचं नाव आहे मुस्कान गोस्वामी. 3 / 7कोविडच्या काळात मुस्कान चर्चेत आली होती. जेव्हा तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मुस्कानने २०२१ ला निखिल ओहरीसोबत लग्न केलं.4 / 7मुस्कानचं आजोबांसारखंच दमदार व्यक्तिमत्व आहे. मुस्कानने अभिनय क्षेत्रात पाऊल न ठेवता वेगळ्या क्षेत्रात करिअर केलंय. मुस्कान एक बिझनेसवुमन आहे.5 / 7मुस्कानचा स्वतःचा कपड्यांचा आणि डिझायनर मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय आहे. ओलानी कँडल्स आणि Intrinsic हा मुस्कानचा कपड्यांचा ब्रँड आहे.6 / 7मुस्कानच्या या दोन्ही ब्रँडला सोशल मीडियावर चांगली मागणी आहे. अशाप्रकारे आजोबा जरी अभिनय क्षेत्रात लोकप्रिय असले तरी मुस्कान मात्र बिझनेसवुमन म्हणून यशस्वी आहे. 7 / 7मुस्कान आणि तिचा पती निखिल या दोघांना काहीच दिवसांपूर्वी मुलगी झाली. आजोबा मनोज कुमार यांच्या करिअरबद्दल मुस्कानला नितांत आदर आहे.