Join us

तब्बू 'या' विवाहित अभिनेत्याच्या होती प्रेमात, पुढे ब्रेकअप झालं अन् आता २७ वर्षांनी दोघे सिनेमात एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 15:50 IST

1 / 7
बॉलिवूड आणि साउथ सिनेमात काम काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे तब्बू. ५३ वर्षांची तब्बू अजूनही सिंगल आहे. पण कोणे एके काळी तब्बू एका सुपरस्टार अभिनेत्यासोबत रिलेशनशीपमध्ये होती. कोण होता हा अभिनेता?
2 / 7
तब्बू ज्या अभिनेत्याच्या प्रेमात होती त्याचं नाव नागार्जुन. तब्बू अनेक वर्षांनी एक्स बॉयफ्रेंड नागार्जुनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे सर्व चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
3 / 7
नागार्जुन यांच्या १०० व्या सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमाचं तात्पुरतं नाव 'किंग १००' असं ठेवण्यात आलंय. चित्रपटात तब्बू नागार्जुनची हिरोईन म्हणून दिसणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
4 / 7
'किंग १००' या सिनेमाचे दिग्दर्शन तमिळ दिग्दर्शक आर. ए. कार्तिक करणार असून, हा चित्रपट कौटुंबिक अॅक्शन ड्रामा प्रकारातील असल्याची चर्चा आहे.
5 / 7
नागार्जुन आणि तब्बू यांचं १९९० च्या काळात अफेअर होतं. नीन्ने पेलडथा या सिनेमाच्या सेटवर त्यांच्यात जवळीक वाढली होती. त्यावेळी नागार्जुनचं लग्न झालं होतं.
6 / 7
तब्बू आणि नागार्जुन प्रेमात असले तरी बायको अमला अक्कीनेनी हिला घटस्फोट देण्यास तो तयार नव्हता. त्यामुळे तब्बू आणि नागार्जुन दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
7 / 7
नागार्जुन आणि तब्बू या दोघांनी कधीही त्यांच्या प्रेमाचा जाहीरपणे खुलासा केला नाही. याशिवाय वेगळं झाल्यावरही त्यांनी एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर ठेवला
टॅग्स :तब्बूनागार्जुनदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टरिलेशनशिपरिलेशनशिपबॉलिवूडTollywood