Join us  

Maharashtra Day 2022: "राकट देशा, कणखर देशा.." रसिका सुनीलने जपला मराठी बाणा; मराठमोळ्या थाटात केलं खास फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2022 12:28 PM

1 / 8
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील.
2 / 8
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या रसिकाने या मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती.
3 / 8
शनाया ही भूमिका साकारुन रसिका खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाली. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.
4 / 8
रसिका सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
5 / 8
कोणताही सणवार असो वा समाजात एखादी घडामोड घडली की रसिका सोशल मीडियाच्या माध्यमातून काही वेळा व्यक्त होते.
6 / 8
यावेळी रसिकाने पारंपरिक मराठमोळ्या थाटात नवं फोटोशूट केलं असून तिने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
7 / 8
'राकट देशा, कणखर देशा,दगडांच्या देशा, नाजुक देशा,कोमल देशा, फुलांच्याही देशा, प्रणाम घ्यावा माझा हा. श्री महाराष्ट्र देशा….महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा', असं कॅप्शन देत रसिकाने तिचे फोटो शेअर केले आहेत.
8 / 8
रसिकाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हाय़रल होत असून त्याला विशेष पसंती मिळत आहे.
टॅग्स :महाराष्ट्र दिनसेलिब्रिटीटेलिव्हिजनरसिका सुनिल