Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला...", अभिनेत्री प्राजक्ता माळीची पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 18:02 IST

1 / 10
अभिनेत्री प्राजक्ता माळी(prajakta mali) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 10
मालिकांपासून करिअरची सुरुवात करणारी प्राजक्ता सध्याच्या घडीला अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 10
प्राजक्ताचा मोठा चाहता वर्ग आहे. सध्या प्राजक्ताची सोशल मीडियावर एक पोस्ट चांगलीच व्हायरल होतेय.(फोटो इन्स्टाग्राम)
4 / 10
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रीपैंकी एक आहे.(फोटो इन्स्टाग्राम)
5 / 10
आपले फोटो, व्हिडीओ आणि आगामी प्रोजेक्टची माहिती प्राजक्ता चाहत्यांना देत असते. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 10
नुकतीच प्राजक्ताची अशी एक पोस्ट चर्चेत आली आहे. यात प्राजक्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. फोटो तिच्यासह नम्रता संभेराव आणि तिचा पती योगेश संभेराव सुद्धा दिसतोय. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 10
“वर्षा” बंगल्याविषयी पहिल्यापासूनच जाम कुतूहल वाटत आलयं…अर्थातच, महाराष्ट्रातल्या महत्वाच्या वास्तूंपैकी ती एक वास्तू आहे…'', (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 10
''परवा मुख्यमंत्री कार्यालयातून गणेश दर्शनाला आणि स्नेहभोजनाला वर्षावर यायला जमेल का? असा फोन आल्यावर खूप आनंद झाला…'' (फोटो इन्स्टाग्राम)
9 / 10
''आम्हासारख्या कलाकारांना घरी बोलावून मान दिल्याबद्दल व आदरातिथ्य केल्याबद्ददल मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे, मा. श्रीकांतजी शिंदे सरांचे व परिवाराचे मनापासून आभार…जॅकी दादांबरोबरचे क्षण म्हणजे cherry on the cake.'' (फोटो इन्स्टाग्राम)
10 / 10
प्राजक्ताला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनला आणि स्नेहभोजनाला आमंत्रित करण्यात आलं होतं. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :प्राजक्ता माळीएकनाथ शिंदे