'ही' अभिनेत्री रणबीरच्या 'रामायण'मध्ये कैकेयीच्या भूमिकेत दिसणार, घटस्फोटित खेळाडूशी केलेलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 13:39 IST
1 / 7बीटाऊनमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचं वैयक्तिक आयुष्यच जास्त चर्चेत राहिलं. अफेअर, लग्न, डिवोर्स या गोष्टी तर मनोरंजनसृष्टीत अगदीच सामान्य आहेत. 2 / 7अशीच एक ४६ वर्षीय अभिनेत्री लारा दत्ता जिने २००० साली 'मिस युनिव्हर्स'चा खिताब जिंकला. अक्षय कुमार, सलमान खान, शाहरुख खानसोबतही तिने काम केलं.3 / 7ती आता रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमात कैकयीच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्रीने एका खेळाडूशी लग्न केलं असून तिला एक मुलगीही आहे.4 / 7 लारा करिअरच्या सुरुवातीला मॉडेल केली डोरजीसोबत लिव्हइनमध्ये राहत होती. त्यांनी एकमेकांना ९ वर्ष डेट केलं. नंतर लारा मिस युनिव्हर्स झाली आणि त्यांच्यात दुरावा आला.5 / 7यानंतर तिचं नाव गोल्फर टायगर वुड्ससोबतही जोडलं गेलं. मात्र तिने या केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं. इतकंच नाही तर डिनो मोरियासोबतही तिच्या अफेअरची चर्चा होती.6 / 7डिनो आणि लाराचंही ब्रेकअप झालं. पुढे लाराच्या आयुष्यात टेनिसपटू महेश भूपतीची एन्ट्री झाली. दोघं प्रेमात पडले. तेव्हा महेश भूपती विवाहित होता. २००९ साली त्याने पत्नीला घटस्फोट दिला आणि २०११ साली त्याने लाराशी लग्न केलं.7 / 7लारा त्याचवर्षी प्रेग्नंटही राहिली. तिला १४ वर्षांची एक मुलगी आहे. लारा लग्नाआधीच गरोदर होती अशी चर्चाही तेव्हा झाली होती.