कास्टिंग काऊचबद्दल ऐकलं होतं, जेव्हा माझ्यासोबतच झालं...; अभिनेत्रीने सांगितला प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 16:42 IST
1 / 7अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना यापूर्वी कास्टिंग काऊचचा अनुभव आलाय. बॉलिवूडमधील अशाच एका अभिनेत्रीला कास्टिंग काऊचचा विचित्र अनुभव आला होता2 / 7ही अभिनेत्री म्हणजे किर्ती कुल्हारी. अनेक अभिनेत्री कास्टिंग काऊचचं नाव ऐकताच घाबरतात. परंतु किर्तीला मात्र हसायला आलेलं. नेमकं काय घडलेलं?3 / 7किर्तीने एका मुलाखतीत एक किस्सा सांगितला होता. तिलाही एकाने इंडस्ट्रीत आल्यावर कॉम्प्रमाईजसाठी विचारलं होतं. त्यावेळी किर्तीला मनोमन हसू आलं 4 / 7किर्तीने अर्थात कॉम्प्रमाईजला नकार दिला. पण तिला या प्रकाराचं हसू आलं कारण तिने या गोष्टीला इतक्या गांभीर्याने घेतलं नाही.5 / 7इंडस्ट्रीत नवीन आल्यावर कास्टिंग काऊचचा प्रकार किर्तीच्या कानावरही आला होता. जेव्हा प्रत्यक्ष अनुभव आला तेव्हा किर्तीला हा प्रकार हास्यास्पद वाटला6 / 7ज्या व्यक्तीने कॉम्प्रमाईज करायला सांगितलं होतं त्याला किर्तीने उलटप्रश्नही विचारला. सगळं जाणून घेतल्यावर किर्तीने या प्रकाराला गांभीर्याने अजिबात घेतलं नाही7 / 7किर्ती कुल्हारीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती आर. माधवनसोबत नुकत्याच रिलीज झालेल्या 'हिसाब बराबर' सिनेमात झळकली आहे