Join us

बरेच अफेअर, लग्नानंतर तीन वर्षात घटस्फोट; दुसऱ्या लग्नाआधीच आई बनली 'ही' अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 17:35 IST

1 / 8
बॉलिवूड कलाकारांमध्ये कोणाचा ब्रेकअप किंवा घटस्फोट होणं हे आता काही नवीन राहिलेलं नाही. अनेक जणांनी आपला बऱ्याच वर्षांचा संसार मोडला आहे.
2 / 8
अशीच एक अभिनेत्री आहे जिचे अनेक अफेअर झाले. प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत ती लग्नबंधनात अडकली. नंतर घटस्फोट झाला. तर काही वर्षांपूर्वीच ती दुसऱ्या लग्नाआधीच आई झाली.
3 / 8
ही अभिनेत्री आहे कल्की कोचलिन (Kalki . कल्की मूळ फ्रान्सची आहे. 'ये जवानी है दिवानी' सारख्या सुपरहिट सिनेमात तिने काम केलं आहे. कल्कीची रिअल लाईफ स्टोरी माहितीये का?
4 / 8
कल्की फ्रान्सवरुन भारतात आली आणि तिने हिंदू धर्म स्वीकारला. तिने उटीमध्ये शिक्षण घेतलं. १८ वर्षांची असताना ती लंडनला गेली. तिथे तिने थिएटर आणि ड्रामाचं शिश्रण घेतलं.
5 / 8
नंतर पुन्हा भारतात आल्यावर तिने अनुराग कश्यपच्या 'देव डी' सिनेमासाठी ऑडिशन दिली आणि तिची निवड झाली. याच सिनेमावेळी दोघं प्रेमात पडले आणि त्यांनी २०११ मध्ये लग्न केलं. अनुराग कल्कीपेक्षा १४ वर्षांनी मोठा आहे.
6 / 8
लग्नानंतर दोन वर्षातच त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली. अखेर २०१५ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.
7 / 8
कल्की तरुणपणी अनेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होती. नुकतंच एका मुलाखतीत ती म्हणाली, 'लग्न आणि मूल झाल्यानंतर या सगळ्यासाठी वेळच मिळत नाही. पण मी अशा लोकांना पाहिलं आहे जे एकावेळी अनेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असतात. अशावेळी त्यांनी एक सीमा ठरवलेली असते.'
8 / 8
७ फेब्रुवारी २०२० रोजी कल्कीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. लग्नाआधीच मूल जन्माला आल्याने तिला खूप ट्रोल केलं गेलं. मात्र नंतर तिने सांगितलं की त्यांचं लग्न झालं आहे.
टॅग्स :कल्की कोचलीनबॉलिवूड