1 / 10हंसिका मोटवानी हे बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. हंसिका कोणतीही फॅशन बिनधास्तपणे कॅरी करते.2 / 10हंसिका ही सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. या माध्यामातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. 3 / 10 सोशल मीडियावर ती कायम तिचे नवनवीन फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.4 / 10अलिकडेच हंसिकाने एक फोटोशूट केलं आहे. यात ती बोल्ड अँड क्लासी दिसत आहे.5 / 10हंसिकाने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हे फोटोशूट केलं आहे. फोटोंमधील हंसिकाच्या हटके लूकवर चाहते फिदा झाले आहेत. 6 / 10हंसिकाचा मोठा चाहतावर्ग आहे. तिनं 2003 साली 'शाका लाका बूम बूम' या हिंदी मालिकेतून हंसिकाने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या शोमध्ये ती बालकलाकाराच्या रुपात झळकली होती.7 / 10हंसिकाला हृतिक रोशन स्टारर 'कोई मिल गया' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. 2007 साली हंसिका हिमेश रेशमियासोबत 'आपका सुरूर' या चित्रपटात झळकली. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या वेळी हंसिका केवळ 16 वर्षांची होती. 8 / 10हंसिका ही 2007 सालीच 'देसमुदुरु' या चित्रपटात मुख्य भुमिकेत झळकली होती. या चित्रपटासाठी तिला साऊथचा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटानंतर तिची फॅन फॉलोईंग प्रचंड वाढली होती. 9 / 10 आतापर्यंत हंसिकाने बॉलिवूडसोबतच अनेक साऊथच्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.10 / 10हंसिका मोटवानीने सोहेल कथुरिया सोबत लग्न केलं आहे. यावर 'लव शादी ड्रामा' ही वेबसीरीज प्रदर्शित झाली आहे. चाहते तिच्या नव्या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.