Join us

दोनदा घटस्फोट अन् दोन मुलींची आई; अभिनेत्री चाहत खन्ना पुन्हा प्रेमात...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 14:59 IST

1 / 9
हिंदी टीव्ही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री चाहत खन्ना पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. होय, सोशल मीडियावरून तिने प्रेमाची जाहिर कबुली दिली आहे.
2 / 9
चाहत खन्ना व रोहन गंडोत्रा या दोघांच्या अफेअरच्या चर्चा ब-याच दिवसांपासून होत्या. अखेर दोघांनीही आपलं रिलेशनशिप ऑफिशिअल केलं आहे.
3 / 9
प्रेम आपला मार्ग शोधतंच..., असं लिहित चाहतने रोहनसोबतचा रोमॅन्टिक फोटो शेअर केला आहे. या पोस्टनंतर चाहते व सेलिब्रिटी चाहतला शुभेच्छा देत आहेत.
4 / 9
चाहत खन्ना ही सिंगल मदर आहे. दोन मुलींची आई आहे. चाहतची दोन लग्न झालीत. पण दुर्दैवाने दोन्ही अपयशी ठरली.
5 / 9
2006 मध्ये चाहतने भारत नरसिंघानीसोबत पहिलं लग्न केलं होतं. पण काहीच महिन्यांत दोघांचा घटस्फोट झाला होता. तेव्हा चाहतने भारतवर शारीरिक व मानसिक छळाचा आरोप केला होता.
6 / 9
यानंतर 2013 मध्ये चाहतने बॉलिवूड राइटर शाहरूख मिर्झाचा मुलगा फरहान मिर्झासोबत दुसरं लग्नं केलं. पण हे लग्नही मोडलं. 2018 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
7 / 9
फरहानपासून चाहतला दोन मुली आहे. फरहानवरही चाहतने गंभीर आरोप केले होते. गरोदरपणाच्या वेळेस हे बाळ नक्की माझंच आहे ना? असं तो विचारायचा. दुस-या मुलीच्या डिलिव्हरीच्या एक दिवस अगोदर त्यानं मला घराबाहेर काढलं होतं, माझ्या आणि माझ्या भावाच्या नात्यावरही संशय घ्यायचा, असे अनेक आरोप तिने केले होते.
8 / 9
बडे अच्छे लगते है या मालिकेमुळे चाहता खन्ना चांगलीच नावारूपाला आली. या मालिकेतील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.
9 / 9
कबूल है,कुमकुम: प्यारा सा बंधन, तुझ संग प्रीत लगाई सजना आणि हीरो भक्ति की शक्ति है यांसारख्या मालिकेत झळकली होती. संजय दत्तच्या प्रस्थानम सिनेमात ती झळकली होती.
टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन