Join us
Daily Top 2Weekly Top 5

PHOTOS: नुसता कहर...! २१ वर्षीय अभिनेत्रीचा घायाळ करणारा लूक; चाहते क्लिन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 17:48 IST

1 / 10
सोशल मीडियामुळे असे अनेक कलाकार समोर आले, ज्यांनी शून्यातून सुरूवात करून विश्व निर्माण केले आहे. अनेक कलाकारांनी टीव्हीपासून अभिनयाची सुरूवात करून गरूडझेप घेतली आहे.
2 / 10
अशीक एक अभिनेत्री म्हणजे अनुष्का सेन. तिने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी भरपूर प्रसिद्धी मिळवली. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
3 / 10
अनुष्का नवनवीन फोटो शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिचे बोल्ड फोटो आणि ग्लॅमरस अदा चाहत्यांना भुरळ घालतात. आता तिने काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
4 / 10
टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा म्हणून अभिनेत्री अनुष्का सेनने प्रसिद्धी मिळवली. तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम करून अगदी कमी वेळात स्वत:चे स्थान निर्माण केले.
5 / 10
अनुष्काचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. 'बालवीर' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. अलीकडेच तिने स्वप्ननगरी मुंबईत एक घर खरेदी केले.
6 / 10
खरं तर अनुष्काने बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. २००९ मध्ये 'यहाँ मैं घर घर खेली' मालिकेतून तिने कलाविश्वात पदार्पण केले होते.
7 / 10
त्यानंतर 'बालवीर', 'देवों के देव महादेव', 'झांसी की रानी' अशा अनेक मालिकांमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली. आता कोरियन सिनेसृष्टीत ती पदार्पण करत आहे.
8 / 10
दरम्यान, अभिनेत्री अनुष्काने अवघ्या २१व्या वर्षी मायानगरी मुंबईत स्वत:चे घर घेतले आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने ही माहिती चाहत्यांना दिली.
9 / 10
अनुष्काने आईवडिलांबरोबरचे नव्या घरातील फोटो शेअर केले होते. 'आमचे नवीन घर...सेन फॅमिली...आणखी एक स्वप्न पूर्ण झाले', अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले होते. अनुष्काने याआधी अवघ्या १७व्या वर्षी BMW गाडी खरेदी केली होती.
10 / 10
टॅग्स :टिव्ही कलाकार