‘Aai Kuthe Kaay Karte’तील अनिरूद्धचे हे जुने फोटो पाहिलेत का? डोळ्यांवर बसणार नाही विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 15:33 IST
1 / 10‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरूद्ध आणि अरूंधतीला आज कोण ओळखत नाही? मालिका इतकी गाजतेय की, या पात्रांची खरी ओळखही मागे पडावी.2 / 10‘आई कुठे काय करते’मध्ये अभिनेते मिलिंद गवळी अनिरूद्धची भूमिका साकारत आहेत. या मालिकेने मिलिंद घराघरात पोहोचले. मिलिंद अनेक वर्षांपासून टीव्ही, मराठी व हिंदी सिनेइंडस्ट्रीत अॅक्टिव्ह आहेत.3 / 10आज मिलिंद यांचे काही जुने फोटो घेऊन आम्ही आलो आहोत. हे फोटो पाहून हाच का अनिरूद्ध यावर क्षणभर विश्वास बसणार नाही.4 / 10तुम्हाला कदाचित माहित नसेल पण बालकलाकार म्हणून मिलिंद गवळी यांनी सिनेसृष्टीत पर्दापण केले होते.5 / 10अभिनय आणि चित्रपटांची आवड त्यांना लहानपणापासूपच होती. अभिनयक्षेत्रात काही तरी करून दाखवाचं, हे स्वप्न त्यांनी खूप आधीच पाहिलं होतं. अभिनयाची आवड त्यांना त्यांच्या स्वप्नांच्या जवळ घेऊन आली.6 / 10 मराठीत त्यांनी आम्ही का तिसरे, शूर आम्ही सरदार, ढोलकीच्या तालावर, वैभवलक्ष्मी, सख्खा भाऊ पक्का वैरी, सून लाडकी सासरची, सासर माझे मंदिर, सासूच्या घरात अशा चित्रपटात काम केले आहेत.7 / 10मराठीसोबत हिंदीतही त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात काम करत तिथे आपल्या अभिनयाचा झेंडा रोवला आहे. 8 / 10मल्याळ सिनेमातही त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. आर्यन या मल्याळम चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली.9 / 102016 साली त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवलं. अथांग हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा.10 / 10 हिंदीत त्यांनी वक्त से पहले, चंचल, वर्तमान, अनुमती, हो सकता है अशा चित्रपटात काम केले आहे. सध्या ते आई कुठे काय करते या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.