Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मलायका कशी आहे?" लोकांचा अर्जुन कपूरला मराठीत प्रश्न, अभिनेत्याने दिलं असं उत्तर की राज ठाकरेंनाही आवरलं नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 10:48 IST

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या रिलेशनशीपची चांगलीच चर्चा झाली. शिवाजी पार्क दीपोत्सव कार्यक्रमात याविषयी लोकांनी अर्जुन कपूरची चांगलीच फिरकी घेतली

अर्जुन कपूर हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. अर्जुन कपूरला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. अर्जुन कपूर गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत होता. कारण तो मलायका अरोरासोबत रिलेशनशीपमध्ये होता. अर्जुन-मलायकाच्या नात्याची इंडस्ट्रीत चांगलीच चर्चा झाली. परंतु काही दिवसांपूर्वी दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या सगळीकडे पसरल्या.  अखेर पहिल्यांदाच अर्जुनने मलायकासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर त्याचं मौन सोडलं असून असा खुलासा केला की राज ठाकरेंनाही हसू आवरलं नाही. काय घडलं नेमकं जाणून घ्या.

मलायका कशी आहे? लोकांचा अर्जुनला मराठीत प्रश्न

अर्जुन कपूर नुकताच शिवाजी पार्कात आयोजित दीपोत्सव कार्यक्रमात सहभागी झालेला. त्यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांची पत्नीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. अर्जुनने हातात बोलायला माईक धरताच सर्वांनी मलायका मलायकाच्या नावाचा जयघोष सुरु केला. एका माणसाने अर्जुनला मराठीच विचारलं की. "मलायका कशी आहे?" त्यावर अर्जुन कपूरसोबतच मागे उभे असलेल्या राज ठाकरेंनाही हसू आवरलं नाही.

मलायकाच्या प्रश्नावर अर्जुनने दिलं हे उत्तर

अर्जुन कपूरने हा प्रश्न ऐकताच तो खळखळून हसला आणि म्हणाला की, "सध्या मी सिंगल आहे त्यामुळे रिलॅक्स करा!" अशाप्रकारे अर्जुनने सध्या तो सिंगल आहे असं सांगितलं. अशाप्रकारे एका वाक्यात अर्जुनने त्याचं मलायकासोबत ब्रेकअप झाल्यावर शिक्कामोर्तब केलंय. काही दिवसांपूर्वी  मलायकाच्या वडिलांंचं अकस्मात निधन झालं. त्यावेळी अर्जुन तिच्या घरी जाऊन मलायका आणि तिच्या कुटुंबाला धीर देताना दिसला.  पण आता मात्र अर्जुनच्या या वक्तव्याने त्याचं ब्रेकअप हे कन्फर्म झालंय. 

 

टॅग्स :अर्जुन कपूरराज ठाकरेमलायका अरोरामलायका अरोरा