Join us

Pathaan Movie : पठाणचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ८ दिवसात ३०० कोटी पार; शाहरुखची क्रेझ कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 10:35 IST

बॉलिवुडच्या वाईट काळात शाहरुखच्या पठाणने नक्कीच क्रांती केली आहे.

Pathaan Movie :  बॉलिवुडचा किंग शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाण सिनेमा रिलीज होऊन एक आठवडा झाला आहे. 8 दिवसात सिनेमाने 348.25 कोटींचा गल्ला जमवला आहे. बॉक्सऑफिसवर सिनेमा धुमाकूळ घालतोय आणि एकापेक्षा एक कामगिरी रचत आहे. काल बुधवारीही पठाणने 18 कोटींची कमाई केली आहे. बॉलिवुडच्या वाईट काळात शाहरुखच्या पठाणने नक्कीच क्रांती केली आहे.

ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी पठाणचे आजपर्यंतचे कलेक्शन शेअर केले आहे. भारतभर पठाणने 348.25 कोटी जमवले आहेत. पहिल्या दिवशी 55 कोटी, दुसऱ्या दिवशी 68 कोटी, तिसऱ्या दिवशी 38 कोटी, चौथ्या  दिवशी विकएंड असल्याने तब्बल 51.5 कोटी, पाचव्या दिवशी 58.5 कोटी, सहाव्या दिवशी 25.5 कोटी, सातव्या दिवशी 22 कोटी आणि आठव्या दिवशी 18 कोटी सिनेमाचे बॉक्सऑफिस कलेक्शन आहे. 

Pathan Movie : बक्कळ कमाईनंतर 'पठाण'च्या तिकीट दरात घट, ४०० कोटींच्या क्लबमध्ये लवकरच एंट्री!

जगभरातही पठाणचा डंका

पठाणने ८ दिवसात वर्ल्डवाईड ६७५ कोटी Gross कलेक्शन केले आहे. येत्या काही दिवसात पठाणचे वर्ल्डवाईड ७०० कोटी कलेक्शन होईल असंच चित्र दिसतंय. केवळ ८ दिवसात पठाणने सर्वांना मागे टाकत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. शाहरुख खान बॉलिवुडचा खरोखरंच किंग आहे हे शाहरुखने पठाणमधून सिद्ध केले आहे. 

टॅग्स :पठाण सिनेमाशाहरुख खानदीपिका पादुकोणजॉन अब्राहम