Join us

Pathaan WorldWide Box Office Collection: बॉलिवूडवर 'पठाण'चं राज्य, ९ दिवशी कमावले इतके कोटी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 13:43 IST

Pathaan Movie Collection : हा चित्रपट शाहरुख खानच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात हिट चित्रपट ठरला आहे.

Pathan Movie :  शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाण चा बॉक्सऑफिसवरील धुमाकूळ बघता चाहत्यांमध्ये किंग खानची क्रेझ काही कमी झालेली नाही. 8 दिवसात सिनेमाने 348.25 कोटींचा गल्ला जमवला आहे. बॉक्सऑफिसवर सिनेमा धुमाकूळ घालतोय आणि एकापेक्षा एक कामगिरी रचत आहे. रिलीजच्या 9 दिवसांत या चित्रपटाने 700 कोटींहून अधिक कमाई केली आहे. बॉलिवुडच्या वाईट काळात शाहरुखच्या पठाणने नक्कीच क्रांती केली आहे.

700 कोटींचा आकडा पारट्रेड अ‍ॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते, रिलीजच्या नवव्या दिवशी 'पठाण'ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 700 कोटींचा आकडा पार केला. इंडस्ट्री ट्रॅकर Sacnilk च्या मते, चित्रपटाने दुसऱ्या गुरुवारी 15 कोटी ते 16 कोटी रुपये कमावले. या चित्रपटाने बुधवारी भारतातील बॉक्स ऑफिसवर ५७ कोटी रुपयांची शानदार ओपनिंग केली. हा चित्रपट आठवड्याच्या मध्यात रिलीज झाला होता, पाच दिवसांच्या विस्तारित वीकेंडमध्ये जगभरात रु. 500 कोटींचा टप्पा पार करण्यात यशस्वी झाला. यामुळे हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात जास्त ओपनिंग वीकेंडची कमाई झाली.

दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर, 'पठाण' चित्रपटगृहांमध्ये जोरादार बॅटिंग करतोय. या आठवड्याच्या शेवटी कोणतेही मोठे रिलीज न झाल्याने, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज्य करत राहील. यापूर्वी कार्तिक आर्यन स्टारर शहजादा हा चित्रपट १० फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता, पण आता हा चित्रपट १७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 

टॅग्स :पठाण सिनेमाशाहरुख खानजॉन अब्राहमदीपिका पादुकोण