Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेग्नंट आहे अभिनेत्री परिणीती चोप्रा ? Video शेअर करत थेट सांगून टाकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 16:31 IST

परिणीतीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

अभिनेत्री परिणीती चोप्राने अभिनय क्षेत्रासह तिच्या संगीत क्षेत्रातही पदार्पण केलं. आता लवकरच परिणीती चोप्रा 'चमकिला' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण, यात चित्रपटापेक्षा अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांनी जोर धरला आहे. परिणीतीचे फोटोज आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. यातच आता परिणीतीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

परिणीतीनं सप्टेंबर २०२३ मध्ये आपचे खासदार राघव चढ्ढा यांच्यासोबत विवाह केला होता. नुकतेच परिणीती 'चमकिला' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात पोहचली होती. यावेळी ती काळ्या कफ्तान ड्रेसमध्ये दिसली. परिणिती चोप्राचे सैलसर कपडे आणि ती ज्या प्रकारे पोटाला स्पर्श करत होती. यावरुन लोकांमध्ये  ती गरोदर असल्याची चर्चा सुरू झाल्या होत्या.  आता परिणीतीनं थेट व्हिडीओ पोस्ट करत प्रग्नेंट असल्याच्या चर्चांना पुर्णविराम लावला आहे.

अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिनं लिहिले की, "आज मी पूर्ण फिट ड्रेस घातला आहे, कारण जेव्हा मी कफ्तान ड्रेस ट्राय केला...". यानंतर कफ्तान ड्रेसशी संबंधित परिणीतीच्या प्रेग्नेंसीच्या हेडलाइन्स चमकू लागतात. तर यापुर्वीही परिणीतीनं प्रेग्नन्सीच्या चर्चांवर पोस्ट केली होती. परिणीतीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आणि ज्यामध्ये तिने एका हसणाऱ्या इमोजीसह असे लिहिले की, 'कफ्तान ड्रेस = प्रेग्नन्सी, ओव्हरसाइज शर्ट = प्रेग्नन्सी, आरामदायक कुर्ता = प्रेग्नन्सी'. अशी मजेशीर पोस्ट शेअर करत प्रेग्नन्सीच्या चर्चा रंगवणाऱ्यांना उत्तर दिलं होतं. 

परिणीती ही 'चमकिला' सिनेमात अमर सिंह चमकीला यांची पत्नी अमरजोत चमकीला यांच्या भुमिकेत आहे. या सिनेमातील विविध पंजाबी गाण्यांना दिलजीत आणि परिणीती या दोघांनीही आवाज दिला आहे. ए आर रहमान यांनी या सिनेमाला संगीत दिले आहे. दरम्यान अमरजोतच्या पात्रासाठी परिणीतीने १५ किलो वजनही वाढवलं होतं. हा चित्रपट १२ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. 

टॅग्स :परिणीती चोप्रासेलिब्रिटीबॉलिवूड