Join us
Daily Top 2Weekly Top 5

ये रिश्ता क्या कहलाता है फेम अभिनेत्री टीव्ही शोमध्ये काम करणार नाही, स्वत: सांगितलं या मागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 18:04 IST

एका मुलाखती दरम्यान अभिनेत्रीने याबाबत खुलासा केला आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री पंखुरी अवस्थी (Pankhuri Awasthi) सध्या मदरहुड एन्जॉय करतेय.  पंखुरीने २५ जुलैला जुळ्या मुलांना जन्म दिला. आई झाल्यानंतर अभिनेत्री कामावर परतली आहे. मुलांना घरी सोडून कामावर जाण्याचा अनुभव सांगितला आहे.

एका मुलाखती दरम्यान अभिनेत्री म्हणाली, 'मी फक्त छोटे प्रोजेक्ट्सवर सध्या काम करत आहे. मी जाहिराती आणि छोट्या शूटिंगपासून सुरुवात करत आहे. आई झाल्यानंतर मी पहिल्यांदाच कामानिमित्त बाहेर गेले आहे. या जाहिरातीचे शूट तीन-चार दिवस मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. मी सध्या शो घेत नाही. मला माझ्या मुलांपासून फार काळ दूर राहायचे नाही. जेव्हा माझी मुलं तीन महिन्यांची होतील, तेव्हा मी कदाचित शूट सुरू करेन, विशेषत: लहान फॉरमॅटसाठी.

मुलांना घरी सोडून कामावर जाण्याबाबत पंखुरी म्हणाली, 'हे अजिबात सोपे नव्हते. मुलांना घरी सोडून कामावर जाणं ही सोप्प नाहीय.. जेव्हा मी घरी असते आणि ते वेगळ्या खोलीत झोपतात तेव्हा मला त्याची आठवण येते. जेव्हा तुम्ही बाळाला जन्म देता तेव्हा गोष्टी बदलतात.

गौतम रोडे आणि पंखुरी हे टीव्हीवरचं लोकप्रिय कपल आहे. दोघांमध्ये तब्बल १४ वर्षांचं अंतर आहे. तसंच पंखुरीला पीसीओडी(PCOD) चा त्रास असल्यानेही ते काही वर्षांपासून बाळासाठी प्रयत्न करत होते. अखेर त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि जुलै महिन्यात पंखुरीने जुळ्या मुलांना जन्म दिला. २५ जुलै रौजी या दोन्ही गोंडस बाळांचा जन्म झाला. गौतम रोडे आणि पंखुरी हे टीव्हीवरचं लोकप्रिय कपल आहे. दोघांमध्ये तब्बल १४ वर्षांचं अंतर आहे. तसंच पंखुरीला पीसीओडी(PCOD) चा त्रास असल्यानेही ते काही वर्षांपासून बाळासाठी प्रयत्न करत होते. अखेर त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि जुलै महिन्यात पंखुरीने जुळ्या मुलांना जन्म दिला. २५ जुलै रौजी या दोन्ही गोंडस बाळांचा जन्म झाला.  

टॅग्स :टिव्ही कलाकार