Join us

सनीचा मुलगा करणचे बॉलिवूड सेलिब्रेटींनी बॉलिवूडमध्ये असे केले स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 18:30 IST

करणचे वडील सनी देओलनेच सोशल मीडियावर पल पल दिल के पास या चित्रपटाचा टीजर शेअर केला असून करणच्या बॉलिवूडमधील एंट्रीसाठी सनी खूप खूश आहे.

ठळक मुद्देसलमान खानने ट्विटरवर हा टीजर शेअर करत लिहिले आहे की, करण तुला खूप साऱ्या शुभेच्छा... पल पल दिल के पास या चित्रपटाद्वारे तुझे बॉलिवूडमध्ये स्वागत आहे...

बॉलिवूडमध्ये आजवर अनेक स्टार कीडची एंट्री झाली आहे. आता अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल पल पल दिल के पास या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या टीजरला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

करणचे वडील सनी देओलनेच सोशल मीडियावर पल पल दिल के पास या चित्रपटाचा टीजर शेअर केला असून करणच्या बॉलिवूडमधील एंट्रीसाठी सनी खूप खूश आहे. करणच्या चित्रपटाचा टीजर पाहिल्यानंतर आता बॉलिवूडमधील मंडळी करणचे भरभरून कौतुक करत आहेत. सनीसोबत अनेक चित्रपटात झळकलेल्या सलमान खानने ट्विटरवर हा टीजर शेअर करत लिहिले आहे की, करण तुला खूप साऱ्या शुभेच्छा... पल पल दिल के पास या चित्रपटाद्वारे तुझे बॉलिवूडमध्ये स्वागत आहे...

 

डर या चित्रपटातील सनीचा सहकलाकार अभिनेता शाहरुख खानने देखील ट्विटरवर लिहिले आहे की, या चित्रपटाचा टिजर खूपच चांगला असून या अतिशय सुंदर चित्रपटासाठी करण आणि सहर यांना खूप साऱ्या शुभेच्छा... सनीने हा चित्रपट अतिशय मेहतीने आणि प्रेमाने बनवला आहे. 

 

पल पल दिल के पास या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः सनी देओलने केले असून या चित्रपटाचा टीजर 5 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा टीजर 5 ऑगस्टलाच प्रदर्शित करण्यामागे एक खास कारण आहे. सनीने 5 ऑगस्टलाच त्याच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यामुळे त्याच्यासाठी हा अतिशय खास दिवस आहे. त्याचा बेताब हा पहिला चित्रपट 5 ऑगस्ट 1983 ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले होते. या चित्रपटात आपल्याला सनी आणि अमृता सिंग यांची जोडी पाहायला मिळाली होती. 

पल पल दिल के पास हा चित्रपट 20 सप्टेंबरला प्रदर्शित होणार असून सनी देओल इतकेच करणला देखील प्रेक्षकांचे प्रेम मिळेल याची या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. 

टॅग्स :करण देओलसनी देओलशाहरुख खानसलमान खान