Join us

 दीपिकाला पाहिल्यावर ओकारी येते, पाकिस्तानी अँकर बरळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 15:30 IST

अनेक पाकिस्तानी कलाकारांनी भारतीय कलाकारांना लक्ष्य केले. आता एका पाकिस्तानी अँकरने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण व प्रियंका चोप्रा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.

ठळक मुद्देसध्या वकारचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

केंद्र सरकारने जम्मू -काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तान बिथरला आहे. कलम 370 रद्द होताच भारतासोबतचे राजकीय संबंध तोडण्याचा, द्विपक्षीय व्यापार बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला. पाठोपाठ बॉलिवूड चित्रपटांवरही पाकिस्तानने बंदी घातली. एवढेच नाही तर भारतीय जाहिरातींचे प्रसारणही थांबवले. अनेक पाकिस्तानी कलाकारांनी भारतीय कलाकारांना लक्ष्य केले. आता एका पाकिस्तानी अँकरने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणप्रियंका चोप्रा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.

पाकिस्तानी अँकर वकार जका याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने दीपिका आणि प्रियंकाच्या दिसण्यावर आक्षेपार्ह विधान केले आहे. या व्हिडीओत वकारने पाकिस्तानात भारतीय कलाकारांचे बिलबोर्ड हटवण्याची मागणी केली आहे. शिवाय मल्टिनॅशनल कंपन्यांना ताकिद दिली आहे. पाकिस्तानात धंदा करायचा तर भारतीय कलाकारांना प्रचारासाठी निवडू नका, असे त्याने म्हटले आहे. एकदा मी दीपिकाला समोरा-समोर बघितले आणि तिला पाहून मला अक्षरश: ओकारी आली होती, असे तो व्हिडीओत म्हणतेय.  प्रियंका चोप्राला पाहिल्यानंतर मला कसेतरी झाले होते. तिचा चेहरा बघता तिने एखाद्या चांगल्या सर्जनला दाखवून प्लास्टिक सर्जरी करायला हवी, असेही तो व्हिडीओत म्हणतोय.सध्या वकारचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. वकार हा अँकर असण्यासोबतच सामाजिक कार्यकर्ताही आहे. दरम्यान प्रियंका व दीपिकाबद्दल आक्षेपार्ह विधान करणा-या वकारला भारतीय युजर्सनी ट्रोल केले आहे.

 

टॅग्स :दीपिका पादुकोणप्रियंका चोप्रा