Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुखच्या पाकिस्तानी अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, माहिराला पाहताच सलीमच्या डोळ्यात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 09:42 IST

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानच्या  दुसऱ्या लग्नाच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या.

शाहरुख खानसोबत 'रईस' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानच्या (Mahira Khan) दुसऱ्या लग्नाच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. अखेर काल दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली. तिच्या या नवीन प्रवासाची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळाल . बॉयफ्रेंड सलीम करीमसोबत तिने निकाह केला. अभिनेत्रीच्या मॅनेजरने तिच्या इन्स्टाग्रामवर तीन व्हिडिओ शेअर केलेत.

माहिरा खानने लग्नात पेस्टल रंगाचा लेहंगा घातला आहे. तर डोक्यावर घेतलेल्या लांब दुपट्ट्याने सर्वांचंच लक्ष वेधलं. माहिरा आणि सलीम यांचा निकाह नक्की कोणत्या ठिकाणी झाला हे मात्र अजून समोर आलेलं नाही.  हिरवंगार लॉन, फुलांनी सजलेलं स्टेज, समोर पाहुणे अशा सुंदर ठिकाणी माहिरा आणि सलीम कायमचे लग्नबंधनात अडकले. माहिरा स्टेजठिकाणी येत असताना सलीमच्या डोळ्यात पाणी येतं. त्यानंतर तो तिच्याजवळ येत दुपट्टा वर करतो. आणि दोघंही एकमेकांना मिठी मारतात. टाळ्यांच्या कडकडाटात सर्व पाहुणे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करतात. अगदी स्वप्नवत वाटावं असा त्यांचा निकाह पार पडतो.  

माहिरा खानबद्दल सांगायचं तर २००७ मध्ये अली अक्सारी सोबत तिचं लग्न झालं होतं. दोघंही अमेरिकेत भेटले होते. अली अक्सारी अभिनेता, निर्माता आहे. लग्नानंतर वयाच्या २४ व्या वर्षीच तिने मुलगा अजलानला जन्म दिला. मात्र काही कारणांमुळे २०१५ माहिरा आणि अलीचा त्यांचा घटस्फोट झाला. तर मुलाची कस्टडी माहिराला मिळाली. अनेक वर्षांनी माहिराला पुन्हा एकदा जोडीदार मिळाला आहे. सलीम करीम हा उद्योजक असून माहिरा आणि त्याची ओळख नक्की कुठे झाली हे समजू शकलेलं नाही. गेल्या अनेक वर्षांपासून दोघंही एकमेकांना डेट करत होते. अखेर आता ते लग्नबंधनात अडकले आहेत.

टॅग्स :माहिरा खानलग्नपाकिस्तान