Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी अभिनेत्यानं हॉलिवूड अभिनेत्रीला केलं Kiss; ट्विटरवर युजर्सच्या येतायत अशा रिअ‍ॅक्शन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 19:07 IST

शोच्या पाचव्या सीझनमध्ये प्रिंस चार्ल्स (आता किंग चार्ल्स तृतीय) आणि प्रिंसेस डायना यांचा विवाह आणि घटस्फोट दाखविण्यात आला आहे.

नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय शो 'द क्राउन' च्या सीझन 5 ला सुरुवात झाली आहे. या शोमध्ये ब्रिटिश मोनार्क क्वीन एलिझाबेथ द्वितीय आणि तिच्या कुटुंबाची कहाणी दाखवली आहे. शोच्या पाचव्या सीझनमध्ये प्रिंस चार्ल्स (आता किंग चार्ल्स तृतीय) आणि प्रिंसेस डायना यांचा विवाह आणि घटस्फोट दाखविण्यात आला आहे.

प्रिंसेस डायनाने घटस्फोटानंतर ब्रिटिश-पाकिस्तानी हार्ट सर्जन डॉक्टर हसनत खान यांना डेट केले होते. 'द क्राउन'मध्ये डॉक्टर हसनत यांची भूमिका पाकिस्तानी अभिनेता हुमायूं सईद यांनी केली आहे. तर डायना यांची भूमिका हॉलीवुड अभिनेत्री एलिझाबेथ डेबिकीने केली आहे. या शोमध्ये एलिझाबेथ डेबिकी आणि हुमायूं यांच्यात एक किसिंग सीन दाखविण्यात आला आहे. सोशल मीडियावर याची जबरदस्त चर्चा होत आहे. 

पाकिस्तानी अभिनेता हुमायून सईद आणि हॉलिवूड अभिनेत्री एलिझाबेथ डेबिकी यांना किस करताना पाहून चाहते आणि सोशल मीडिया युजर्स थक्क झाले आहेत. या सीनमुळे ट्विटरवर गोंधळ उडाला आहे. हुमायूं आणि एलिझाबेथ यांचा किसिंग सीन काही युजर्सना आवडला आहे, तर काहींचे अक्षरशः पाणी-पाणी होत आहे.

हॉलीवुडच्या एवढ्या मोठ्या शोमध्ये हुमायूं सईदला पाहून काही युजर्स आनंदी होत आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे, की अभिनेत्याने पाकिस्तानचे नाव जगभरात उंचावले. तसेच दुसरीकडे, काही युजर्स असेही आहेत, जे म्हणत आहे, की हुमायूंला पडद्यावर कुणाला Kiss करताना बघण्याची संधी कधी मिळेल, याचा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता. 

 

टॅग्स :हॉलिवूडनेटफ्लिक्सपाकिस्तान