'पद्मावत' सिनेमा २०१८ ला रिलीज झाला. संजय लीला भन्साली यांनी 'पद्मावत' सिनेमा दिग्दर्शित केलाय. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. सिनेमातील गाणी, कथा, पटकथा, भन्सालींचं दिग्दर्शन अशा सर्वच गोष्टींचं कौतुक झालं. पण ज्यांना २०१८ ला 'पद्मावत' थिएटरमध्ये पाहता आला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. 'पद्मावत' सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये रिलीज होत आहे. भन्साली प्रॉडक्शनने सिनेमा री-रिलीजची तारीख जाहीर केलीय.
'पद्मावत' सिनेमा पुन्हा कधी रिलीज होतोय?
वॉयकॉम १८ स्टूडियो आणि भन्साली प्रॉडक्शन यांनी इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करुन ही खास बातमी सर्वांना सांगितली. निर्माते आणि दिग्दर्शक 'पद्मावत' सिनेमा पुन्हा रिलीज करण्याच्या तयारीत आहेत. २४ जानेवारीला 'पद्मावत' सिनेमा तुमच्या नजीकच्या थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होईल. 'पद्मावत' सिनेमात दीपिका पादुकोणने राणी पद्मावतीची भूमिका साकारलेली तर रणवीर सिंगने अलाउद्दीन खिलजी तर शाहिद कपूर रावल रतन सिंग राजाच्या भूमिकेत दिसला होता.
'पद्मावत' सिनेमाविषयी आणखी काही
२०१८ साली आलेल्या 'पद्मावत' सिनेमात खरी घटना बघायला मिळाली. जेव्हा अलाउद्दीन खिलजी हा वाईट हेतून रावल रतन सिंग यांची पत्नी पद्मावतीला पाहण्याची इच्छा प्रकट करतो. त्यानंतर रावल रतन सिंग एका आरश्याचं प्रतिबिंब वापरुन पद्मावतीची छबी खिलजीला दाखवतात. परंतु तरीही खिलजीचं मन भरत नाही. पुढे खिलजी कपटी मार्गाने रावल रतन सिंगला मारतो. आणि पद्मावतीला मिळवण्यासाठी जीवाचं रान करतो. त्याचवेळी पद्मावतीसोबत अनेक बायकांनी जौहर करुन आगीच्या ज्वालांमध्ये स्वतःला झोकून दिलं असतं. भन्सालींच्या 'पद्मावत' सिनेमाचं आजही कौतुक होतं.