Join us

एक नवी हॉरर मालिका प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 16:43 IST

कौन है? मध्ये शालेन भानोत, पंखुरी अवस्थी, नीता शेट्टी भूमिका साकारत आहेत आणि प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणार आहेत.

कलर्स एक नवी हॉरर मालिका कौन है? घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. हि मालिका  शास्त्र फिक्शन, फँटसी आणि वास्तविक जीवनात घडलेल्या घटनांवर आधारित आहे. प्रत्येक एपिसोड मध्ये परामानसिक उपक्रमांच्या आणि अनुभवांच्या घटनांचे वर्णन केलेले आहे. त्यात तर्कशास्त्र नाकारले जाते आणि अज्ञाताच्या क्षेत्रात डोकावले जाते. कॉन्टिलो पिक्चर्स द्वारा निर्मित हा शो प्रारंभ होत आहे. वैविध्यपूर्ण विषय देण्याचे वचन लक्षात ठेवत कौन है? मध्ये शालेन भानोत, पंखुरी अवस्थी, नीता शेट्टी भूमिका साकारत आहेत आणि प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणार आहेत.

या वैशिष्ट्यपूर्ण स्वरुपाच्या शोविषयी बोलताना, कलर्सच्या प्रोग्रॅमिंग प्रमुख, मनीषा शर्मा म्हणाल्या, “कौन है ? मधून आम्ही मूलतत्वांकडे परत येत आहोत आणि आमचा मनोरंजन कॅटलॉग अजून जोमदार करण्यासाठी हा प्रकार पुनरुज्जीवित करत आहोत. शो विषयी बोलताना, शोचे लेखक व स्टुडंट ऑफ द इअर 2 या सिनेमाचे स्क्रीनप्ले लेखक तसेच भारतात ज्यांनी जास्तीत जास्त भयपट शब्दांकित केले आहेत ते लेखक अर्शद सईद म्हणाले, “भयपट हा असा प्रकार आहे ज्याला पटकथेच्या बाबत सुस्पष्टता व्हिज्युअल सह असण्याची गरज असते. संपूर्ण टीमने या कथा जिवंत करण्यासाठी अतिशय मेहनत केली आहे ज्या संबध्द आहेत त्याच बरोबर धडकी भरविणाऱ्या सुध्दा आहेत. टेलिव्हिजन साठी लिहिणे हे आव्हानात्मक तसेच रोमांचक सुध्दा आहे आणि मला खात्री आहे की आमचे प्रेक्षक सुध्दा प्रत्येक कथेने सुन्न होतील.”

कॉन्टिलो पिक्चर्स चे सीइओ- अभिमन्यू सिंग म्हणाले, “कौन है” चे चित्रीकरण देशाच्या विविध भागात केलेले आहे जसे की काश्मीर, राजस्थान, गुजरात, कॅलकटा, एमपी इ. त्यांनी पुढे सांगीतले, “हे सर्व भीतीदायक क्षण आहेत आणि त्यात प्रेक्षक खिळून राहतील आणि सुन्न होतील. चक्रवर्ती अशोक सम्राट नंतर पुन्हा एकदा कलर्स सोबत सहयोग करताना आम्हाला आनंद होत आहे.”

टॅग्स :टेलिव्हिजनकौन है