Join us
Daily Top 2Weekly Top 5

कधी काळी रिजेक्ट झालेली नेहा कक्कर त्याच रियालिटी शोची बनली जज, आहे इतकी संपत्ती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 06:00 IST

नेहा कक्करने बॉलीवुमध्ये गायिका म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे ज्या शोमध्ये ती जज आहे त्याच शोमधून तिने तिच्या करियरची सुरूवात केली होती. याच शोच्या दुसऱ्या सीजन पासून केली होती. जेव्हा नेहा 11वीमध्ये होती. तेव्हा ती कंटेस्टेंट म्हणून या शो मध्ये गेली होती. 

तुमच्या अंगी कला असेल तर यश, पैसा आणि प्रसिद्धी नक्की मिळते. हे सिद्ध करून दाखवलंय बॉलीवुडची गायिका नेहा कक्कर हिने. नेहा सध्या एका सिंगिंग रिअलिटी शोची जज आहे. शिवाय तिने बॉलीवुमध्ये गायिका म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे ज्या शोमध्ये ती जज आहे त्याच शोमधून तिने तिच्या करियरची सुरूवात केली होती. याच शोच्या दुसऱ्या सीजन पासून केली होती. जेव्हा नेहा 11वीमध्ये होती. तेव्हा ती कंटेस्टेंट म्हणून या शो मध्ये गेली होती. 

या शोमध्ये ती त्यावेळी यश मिळवू शकली नाही. तिल रिजेक्ट करण्यात आलं होतं. तरीही ती खचली नाही. मोठ्या मेहनतीने तिने स्वतःची यशस्वी गायिका अशी ओळख निर्माण केली. नेहा आज बॉलिवूडच्या टॉप सिंगर्सपैकी एक आहे. ती गाण्याचे 10 ते 15 लाख रुपये ती मानधन घेते. एखाद्या सिनेमात तिला गाणे कंपोज करण्यासाठी घेतले गेले तर ती दोन ते तीन लाख रुपये महिन्याला घेते. 4 वर्षांची होती तेव्हापासूनच तिने संगीताचे धडे घेण्यस सुरुवात केली होती.

नेहाने तिचा भाऊ टोनी कक्कड आणि बहीण सोनू कक्कड यांच्याकडून प्रशिक्षण घेतली. नेहा सुरुवातीला आपल्या भाऊ बहिणीसोबत जागरणमध्ये गायची. गायनातील यशामुळेच नेहा सध्या मुंबईच्या वर्सोवा येथील 3BHK अपार्टमेंटमध्ये राहते. ज्याची किंमत 1.2 कोटी रुपये आहे. नेहाकडे आठ महागड्या आलिशान कार आहेत. काही दिवसांपूर्वीच नेहाने मर्सिडीज खरेदी केली आहे. तिच्या या नवीन कारची किंमत 95.72 लाख आहे. नेहाची संपत्ती 51.80 कोटी एवढी आहे.

अभिनेता हिमांश कोहलीसोबत नेहाचे  ब्रेकअप झाले. या ब्रेकअपनंतर नेहाला सावरणे कठीण जातेय. पण हळूहळू यातून बाहेर येण्याचे प्रयत्न नेहाने चालवले आहेत. गतकाळ विसरून आयुष्यात पुढे जाण्याची तिची धडपड स्पष्ट दिसतेय. ब्रेकअपचे दु:ख विसरण्याचा प्रयत्न करत, नेहाने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे.

 

या फोटोत ती हसताना दिसलेय. यासोबत लिहिलेला मॅसेज बरेच काही सांगणारे आहे. ‘पुरेसा सन्मान आणि प्रेम मिळाल्यास महिलांच्या चेह-यावर आणखीच तेज येते...’ असे नेहाने लिहिले आहे. कुणाच्या चेह-यावर हसू नसेल तर त्याला आपल्या चेह-यावरचे हास्य द्या, असे नेहाने लिहिले आहे.ताज्या मुलाखतीत नेहाने हिमांशबद्दल बोलायला नकार दिला होता. अगदी कोण हिमांश? मी त्याला ओळखत नाही. अशा नावाची कुठलीच व्यक्ती माझ्या परिचयाची नाही,असे ती म्हणाली होती. नेहा व हिमांश गत ४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.  नेहा व हिमांश दोघेही ‘ओह हमसफर’ या व्हिडिओत एकत्र दिसले होते. 

टॅग्स :नेहा कक्करहिमांश कोहली