Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठरलं तर! शानदार सोहळ्यामार्फत 'या' खास तारखेला नितेश तिवारींची 'रामायण'बाबत मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 12:13 IST

रणबीर कपूर - साई पल्लवीची प्रमुख भूमिका असलेल्या रामायणा सिनेमाची घोषणा या खास दिवशी होणार आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून रणबीर कपूर - साई पल्लवी यांच्या 'रामायण' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. नितेश तिवारी या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. प्रभासच्या आदिपुरुषने लोकांची घोर निराशा केल्याने आता रणबीर - साईच्या 'रामायण' सिनेमाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आहेत. अशातच नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार नितेश तिवारी या खास दिवशी 'रामायण' सिनेमाची भव्यदिव्य घोषणा करणार आहेत.

Its Cinema ने दिलेल्या अहवालानुसार, साई पल्लवी - रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची घोषणा पुढील महिन्यात एप्रिलमध्ये होणार आहे.  नितेश तिवारी रामनवमीचा खास मुहुर्त साधत 'रामायण' सिनेमाची भव्यदिव्य घोषणा करणार आहेत. बुधवारी १७ एप्रिलला 'रामायण' सिनेमाची अधिकृत घोषणा केली जाईल. हा पॅन इंडिया प्रोजेक्ट असल्याने संपूर्ण भारतभर भव्यदिव्य थाटात 'रामायण'ची घोषणा करण्यात येईल.

'रामायण' सिनेमाच्या कास्टिंगबद्दल सांगायचं तर.. रणबीर कपूर 'रामायण' सिनेमात प्रमुख श्रीरामांच्या भूमिकेत आहे. तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.  रावणाच्या भूमिकेत केजीएफ स्टार यश झळकणार आहे. तर सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार असून बॉबी देओल कुंभकर्णाच्या भूमिकेत झळकणार आहे. अभिनेत्री लारा दत्ता कैकेयीची भूमिका साकारणार असून दशरथाच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन झळकणार असल्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :रणबीर कपूरसाई पल्लवीबॉबी देओलसनी देओलरामायणलारा दत्तायश