Join us

बाबो..! रिंकू राजगुरू दिवसेंदिवस होत चाललीय अधिकच ग्लॅमरस, फोटोंची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 13:11 IST

नुकतेच रिंकूने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच रिंकूने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

रिंकू राजगुरूने सैराट चित्रपटासाठी ऑडिशन दिले त्यावेळी ती फक्त १३ वर्षांची होती. आता रिंकू चांगलीच मोठी झाली आहे. सैराटच्या यशानंतर तिला चांगल्या चित्रपटाच्या ऑफर्स आल्या. या सिनेमानंतर तिने कागर, मेकअप या चित्रपटात काम केले. तसेच ती लारा दत्तासोबत हिंदी वेबसीरिज हंड्रेडमध्येदेखील झळकली. नुकतीच ती अॅमेझॉन प्राइमवरील अनपॉज्ड या सिनेमातही पहायला मिळाली. रिंकू तिच्या प्रोजेक्टसोबतच बऱ्याचदा तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत येत असते.

गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत आहे. त्यात ती खूप ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या ग्लॅमरस फोटोंची चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये होताना दिसते आहे. तेव्हाची रिंकू राजगुरू आणि आताची रिंकू राजगुरूमधील फरक तिच्या फोटोतून स्पष्टपणे पहायला मिळतो आहे. 

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.

याशिवाय रिंकू राजगुरू अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात दिसणार आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरूसैराट 2लारा दत्ताअमिताभ बच्चनप्रार्थना बेहरे