Join us

OMG...! अनिल कपूरला भेटला त्याच्यासारखा दिसणारा हुबेहूब व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 17:45 IST

अभिनेता अनिल कपूर लवकरच माधुरी दीक्षितसोबत टोटल धमाल चित्रपटात झळकणार आहे.

अभिनेता अनिल कपूर आणि त्याची 'टोटल धमाल' चित्रपटातील सहकलाकार माधुरी दीक्षित हे दोघे सुपर डान्सरच्या तिसऱ्या सीझनच्या सेटवर भेटण्यासाठी येणार आहेत. या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी अनिल कपूरला आश्चर्यचकित करण्यासाठी हुबेहूब त्याच्यासारखा दिसणाऱ्या एका माणसाला मंचावर आणले होते. त्या माणसाने स्टेजवर एकदम डॅशिंग एंट्री घेतली आणि अनिलच्या 'ए जी ओ जी' ह्या गाण्यावर त्याच्या वैशिष्ठ्यपूर्ण हालचालींसह नृत्य केले आणि नंतर अनिलने त्याला स्टेजवर साथही दिली. अनिल त्याचे नृत्य बघून खूपच प्रभावित झाला आणि त्याच्याशी संवाद साधला. 

अनिल कपूर म्हणाला, "मला कधी वाटले नव्हते की माझ्यापेक्षा कुणी चांगले असेल पण तुझा चेहरा, केस, शरीर आणि इतकंच काय नाचसुद्धा माझ्यापेक्षा चांगला आहे. मला ४० वर्षांत एवढे असुरक्षित कधीच वाटले नव्हते."

त्यानंतर सर्वांना असे समजले की अनिलसारख्या दिसणाऱ्या त्या माणसानी भारतभरात ३००० पेक्षा जास्त गिग्ज केले आहेत आणि तो परदेशातही प्रसिद्ध आहे. त्याने तेजाबमधील एक प्रसिद्ध संवाद म्हणून दाखवला आणि अनिल त्यानेदेखील प्रभावित झाला. अनिल कपूर म्हणाला, "मला खूप धन्य वाटते की माझ्यामुळे तुला एवढे शोज मिळत आहेत आणि ते तुमच्या उदरनिर्वाहासाठी महत्वाचे आहे. तू ३००० पेक्षा जास्त शोज केले आहेस आणि त्याचा मला अतिशय अभिमान वाटतो. मी स्वतःसुद्धा एवढे केले नाही आहेत आणि आता मला ६००० करावेसे वाटत आहेत."त्या माणसाने नंतर सुपर जज असलेल्या गीता कपूरला फ्लर्ट केले त्यावर ती उपरोधाने म्हणाली, "ओरिजिनल समोर असताना मी डुप्लिकेटची निवड का करू?" त्या डुप्लिकेटने अनिल कपूरला प्रभावित केले पण गीता कपूरवर मात्र त्याचा विशेष परिणाम झाला नाही.

टॅग्स :सुपर डान्सरअनिल कपूरमाधुरी दिक्षित