Join us
Daily Top 2Weekly Top 5

अरेच्चा...! 'जागो मोहन प्यारे'नंतर आता 'भागो मोहन प्यारे', हे असणार कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 06:30 IST

अभिनेता अतुल परचुरे, अभिनेत्री श्रृती मराठे आणि सुप्रिया पाठारे हे अफलातून त्रिकुट झी मराठी वाहिनीवरील 'जागो मोहन प्यारे' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि त्यांच्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केले आहे.

अभिनेता अतुल परचुरे, अभिनेत्री श्रृती मराठे आणि सुप्रिया पाठारे हे अफलातून त्रिकुट झी मराठी वाहिनीवरील 'जागो मोहन प्यारे' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि त्यांच्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केले आहे. या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी आणि मालिकेचे कथानक रसिकांना भावली. आता झी मराठी वाहिनीवर नवीन मालिका दाखल होत आहे. ज्याचे नाव आहे 'भागो मोहन प्यारे' .

श्रृतीने साकारलेली भानु आणि तिच्या मालकाच्या भूमिकेतील अतुल परचुरे रसिकांच्या मनात घर करुन गेले. प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे जागो मोहर प्यारे या मालिके नंतर 'भागो मोहन प्यारे' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या मालिकेत देखील अभिनेता अतुल परचुरे प्रमुख भूमिका निभावणार आहे. या मालिकेबद्दलची माहिती जरी गुलदस्त्यात असली तरी देखील सूत्रांकडून कळतंय की या मालिकेची कथा ही पूर्णपणे वेगळी असणार आहे. तसंच तिचा जागो मोहन प्यारे या मालिकेच्या कथेशी काहीही संबंध नसेल. या मालिकेत अतुल शिक्षकाची भूमिका निभावणार आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, आपल्या अनोख्या स्टाइलनं प्रेक्षकांना हसवणारा अभिनेता अतुल परचुरे या नव्या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी मोहनच्या आयुष्यात एक सुंदरी येणार आहे, पण भूताच्या रुपात. ही दोघं काय धमाल करताहेत ते आता बघू या. 

अतुल परचुरे सोबत सहकलाकार कोण असतील आणि कथानक काय असेल, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. 

टॅग्स :अतुल परचुरेश्रुती मराठे